पिंपरी पोलीस ठाण्याचे सिंघम म्हणवून घेणाऱ्या अधिकाऱ्याची पत्रकारांना अरेरावी

पिंपरी-चिंचवड : कृष्णा पांचाळ – पिंपरी पोलीस ठाण्याच्या आवारात सहाय्यक पोलीस निरीक्षक अन्सार शेख यांनी असंवेदनशिलता दाखवत पत्रकारांसोबत अरेरावी केली यामुळं पोलिसांची काळी बाजू समोर आल्याची चर्चा आहे.याप्रकरणी पोलीस आयुक्त आर.के पदमनाभन यांनी स्वतःलक्ष घालत पिंपरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार यांच्याकडे या प्रकरणाची विचारणा केली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’63c59f23-d129-11e8-b852-25c75efb3db1′]

कंजारभाट समाजाच्या तरुणीने कौमार्य प्रथेचा विरोध केल्याने मंडळाने दांडिया खेळायला विरोध केल्याची तक्रार पिंपरी पोलीस ठाण्यात दिली होती.संबंधित तरुणी पिंपरी पोलीस ठाण्यात आल्यानंतर यासंदर्भात माध्यमांनी तरुणीची प्रतिक्रिया जाणून घ्यायची होती,तेवढ्यात स्वतःला सिंघम म्हणून घेणारे आणि अविर्भावात राहणारे अधिकारी अन्सार शेख यांनी हद्द पार केली आणि थेट पत्रकारांनाच पोलीस ठाण्याच्या आवारात मुलाखत (बाईट) घ्यायची नाही.गेट च्या बाहेर घ्यायची असेल तर घ्या सामान्य व्यक्तीच्या मुलाखती या ठिकाणी घेऊ शकत नाहीत.अस शेख म्हणाले परंतु पत्रकारांनी यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांची मुलाखत देखील बाहेर घेऊ अस म्हटले,तरी देखील शेख हे त्यांच्याच बोलण्यावर ठाम होते.त्यानंतर देखील ते पत्रकारांशी अरेरावी करत होते.अखेर पत्रकारांनी तरुणीला पोलीस ठाण्याच्या गेट च्या बाहेर बोलवून प्रतिक्रिया घेतली.

याप्रकरणी योग्य दखल घेऊ अस पोलीस उपायुक्त स्मर्तना पाटील म्हणाल्या आहेत.पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार यांनी अन्सार शेख यांना समज देणार असल्याचे म्हटले आहे.परंतु अस वागणं एखाद्या पोलीस अधिकाऱ्याला शोभत नसल्याच्या प्रतिक्रिया पोलीस कर्मचाऱ्यांमधून येत आहे.त्यामुळे या घटनेनंतर तरी पोलीस अधिकारी अन्सार शेख यांच्या बोलण्यात गोडवा येतो की नाही हे पाहावं लागेल.

[amazon_link asins=’B07D9G1GHB,B07417987C’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7ddefc87-d129-11e8-bad3-9d5d3e82ef23′]