UP : खुर्चीवरून ठाणे अंमलदाराला दिसेल कोठडी, काचेपासून बनवले आहे ‘हे’ हायटेक पोलीस स्टेशन

मेरठ : मेरठच्या पोलीस ठाण्यात 16 सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत परंतु ठाणे अंमलदाराच्या खोलीतून सीसीटीव्ही कॅमेर्‍याशिवाय सुद्धा कोठडीपर्यंत लक्ष ठेवता येते. या पोलीस ठाण्याच्या चारही बाजूला काचा लावलेल्या आहेत. ठाणे अंमलदाराच्या खोलीतून थेट कोठडीपर्यंत पाहिले जाऊ शकते. ठाण्यात झाडे-झुडपे, स्वच्छता मेंटेन रजिस्टर इत्यादी आहे.

आज आम्ही तुम्हाला मेरठचे एक असे पोलीस ठाणे दाखवणार आहोत जे पाहताच वाटेल की, परदेशातील पोलीस ठाण्यात आपण पोहचलो आहोत. या पोलीस ठाण्यात ती प्रत्येक गोष्ट आहे ज्याबाबत किमान ती पोलीस ठाण्यात असण्याचा विचार आपण करू शकत नाही.

पोलीस ठाणे असे म्हटल्यावर एक वेगळे चित्र समोर उभे राहते. सामान्यपणे तुम्ही उत्तर प्रदेशच्या कोणत्याही पोलीस ठाण्यात गेलात तर तुम्हाला सर्वप्रथम तुटलेल्या भंगार गाड्या दिसतात. ठाण्याच्या जर्जर झालेल्या इमारती दिसतील. मोडक्या खुर्च्याही दिसतील. येथील पोलीस कर्मचारी मात्र ऐटीतच विचारतील कसं काय येणं केलंत?

परंतु, आज आम्ही तुम्हाला असे पोलीस ठाणे दाखवणार आहोत जे एखाद्या मॉल किंवा शोरूमपेक्षा कमी नाही. हे मेरठचे टीपीनगर पोलीस ठाणे आहे. ज्याचा कायापालट केला आहे.

या पोलीस ठाण्यात प्रवेश करताच सर्वत्र काचाच काचा दिसतील. शानदार फर्नीचर दिसेल, सीसीटीव्ही कॅमेरे चमकताना दिसतील आणि प्रत्येक वस्तू अशी ठेवलेली दिसेल जशी आत्ताच साफ-सफाई झाली आहे. येथे मोफत वाय-फाय सुविधा सुद्धा आहे.

विशेष हे आहे की, येथील ठाणे अंमलदाराच्या खोलीसह कार्यालयाच्या प्रत्येक खोलीत सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. एकुण सोळा सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. या काचेच्या पोलीस ठाण्यात ठाणे अंमलदार सीसीटीव्हीशिवाय कोठडीतील आरोपींना सुद्धा पाहू शकतो. असे म्हणू शकता की हे ठाणे ट्रान्सपरंट आहे. एसएसपी मेरठ यांनी गुरुवारी या पोलीस ठाण्याचे उद्घाटन केले.