‘तिरडी’वर वडिलांचं ‘मृत’ शरीर, अधिकारी ‘कन्ये’नं स्वातंत्र्यदिनी ‘परेड’चे नेतृत्व करत निभावलं ‘कर्तव्य’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : तामिळनाडू पोलिसांतील एका महिला निरीक्षकाने आपल्या वडिलांचा मृत्यू झालेला असूनही अंत्यसंस्कार थांबवून स्वातंत्र्य दिनाच्या परेडचे नेतृत्व करण्याच्या कर्तव्यास महत्त्व दिले. सशस्त्र राखीव पोलिस निरीक्षक एन. माहेश्वरी यांनी वडिलांच्या मृत्यूचे दु:ख असूनही जिल्हाधिकारी शिल्पा प्रभाकर सतीश आणि पोलिस अधीक्षक एन. मणिवन्नन यांना गार्ड ऑफ ऑनर दिले.

पोलिसांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की 14 ऑगस्टच्या रात्री माहेश्वरी यांना त्यांच्या वडिलांच्या निधनाची बातमी मिळाली होती, तरीही शनिवारी सकाळी परेडचे नेतृत्व केल्यानंतरच त्यांनी अंत्यसंस्कारात भाग घेतला. यातून त्यांची देशभक्तीची भावना प्रतिबिंबित होते.

पोलिस खात्याने सांगितले की व्यक्तिगत संवेदना आणि दु:खाच्या भावनांपेक्षा जास्त कर्तव्य बजावण्याला त्यांनी महत्त्व दिले, ज्यामुळे विभागाला त्यांचा अभिमान आहे. परेड दरम्यान या अधिकाऱ्यांनी वैयक्तिक हानीची किंचितशी देखील भावना दर्शविली नाही आणि पोलिसांच्या पथकाचे सन्मानपूर्वक नेतृत्व केले. निरीक्षकांचे 83 वर्षीय वडील नारायणसामी यांचे दिंडीगुल जिल्ह्यात निधन झाले.