धक्कादायक ! पोलीस कर्मचाऱ्याचा तरुणीवर बलात्कार, विवाहानंतर फुटलं ‘बिंग’

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – शेतात कापूस वेचणाऱ्या एका तरुणीवर शेत मालक असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित तरुणी तीन महिन्याची गरोदर राहिली असून आरोपी हा जिल्हा पोलीस दलात हवालदार म्हणून कार्यरत आहे. कैलास तुकाराम धाडी (रा. लोणवाडी, ता. जळगाव) असे तरुणीवर अत्याचार करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. कैलास धाडे याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात पीडित तरुणीने तक्रार दिली असून तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी कैलास धाडे विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, कैलास धाडी याने ऑक्टोबर 2019 मध्ये गावातील एका 19 वर्षीय तरुणी त्याच्या शेतात कापूस वेचण्यासाठी गेली होती. तरुणी विहिरीवर पाणी आणण्यासाठी जात असताना एका पत्र्याच्या शेडमध्ये कैलास याने तिच्यावर जबदस्तीने अत्याचार केले. हा प्रकार कोणाला सांगितला तर जिवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडित तरुणीन घाबरून याची कोठेही वाच्चता केली नाही. मध्यंतरीच्या काळात कैलास याने पीडित तरुणीवर वारंवार अत्याचार केले.

लग्नानंतर बिंग फुटले
या प्रकारानंतर 24 मे 2020 रोजी पीडित तरुणीचे लग्न झाले. 28 मे रोजी त्रास होऊ लागल्याने तिच्या पती व सासरच्यांनी तिला चाळीसगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यावेळी पीडित तरुणी तीन महिन्यांची गरोदर असल्याचे उघड झाले. तेव्हा पीडितेने झाल्या प्रकाराची माहिती पती व सासरच्यांना दिली. रविवारी पीडिता माहेरी आली असता कुटुंबाला घेऊन तिने रात्री एमआयडीसी पोलीस ठाणे गाठले.

तिने झालेल्या प्रकाराची सर्व माहिती सांगितल्यानंतर मानव संसाधन विभागाच्या सहायक पोलीस निरीक्षक सुनंदा पाटील यांनी पीडित तरुणीची तक्रार नोंदवून घेतली. कैलास धाडे याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक अमोल मोरे आणि कॉन्स्टेबल रतिलाल पवार हे तपास करत आहे. दरम्यान कैलास हा फरार झाला असून पोलिसांचे एक पथक त्याच्या शोधासाठी रवाना करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like