Police Officer Transfer | मुंबईतील पोलिस उपायुक्त पठाण व मणेरे, सहाय्यक आयुक्त संजय पाटील व शिंदे आणि मपोनि आशा कोरके यांची बदली

मुंबई न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Police Officer Transfer | मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह (former mumbai commissioner param bir singh) यांच्यासह 5 पोलिस अधिकार्‍यांवर मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याने संबंधित पोलिस अधिकार्‍यांची जनहितार्थाच्या कारणास्तव बदली करण्यात आली आहे. त्यांना अप्पर पोलिस आयुक्त (सशस्त्र पोलिस) नायगांव (मुंबई) यांच्या कार्यालयाशी सलग्न (Police Officer Transfer) करण्यात आले आहे. त्याबाबतचा आदेश मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे (mumbai police commissioner hemant nagrale) यांनी दिला आहे.

पोलिस उपायुक्त अकबर पठाण deputy commissioner of police akbar pathan (सध्याची नेमणुक – गुन्हे शाखा, प्रकटीकरण, डी-1, मुंबई), उपायुक्त पराग मणेरे deputy commissioner of police parag manere (सध्याची नेमणुक – आर्थिक गुन्हे, मुंबई), सहाय्यक आयुक्त संजय पाटील assistant commissioner of police sanjay patil (सध्याची नेमणुक – गुन्हे शाखा, मुंबई), सहाय्यक आयुक्त सिध्दार्थ शिंदे assistant commissioner of police sidharth shinde
(सध्याची नेमणुक – गुन्हे शाखा, मुंबई) आणि महिला पोलिस निरीक्षक आशा कोरके
police inspector asha korke (सध्याची नेमणुक – आझाद मैदान, पोलिस स्टेशन)
यांना अप्पर आयुक्त (सशस्त्र पोलिस) नायगांव यांच्या कार्यालयाशी सलग्न करण्यात आले आहे.

 

संबंधित अधिकार्‍यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, अकबर पठाण यांच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार उपायुक्त प्रकाश जाधव (deputy commissioner of police prakash jadhav) तर उपायुक्त मणेरे यांच्रूा पदाचा अतिरिक्त कार्यभार उपायुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी (deputy commissioner of police dr. shrikant paropkari) यांच्याकडे सोपविण्यात
आला आहे. सहाय्यक आयुक्त संजय पाटील आणि सिध्दार्थ शिंदे यांच्याकडील कार्यभाराबाबत
सह आयुक्त (गुन्हे शाखा) हे पर्याय व्यवस्था करणार आहेत
तर महिला पोलिस निरीक्षक आशा कोरके यांच्याकडील कार्यभाराबाबत अप्पर आयुक्त
(दक्षिण प्रादेशिक विभाग)हे अंतर्गत पर्यायी व्यवस्था करणार आहेत.

 

Web Title : Police Officer Transfer | Mumbai Deputy Commissioners of Police Pathan and Manere, Assistant Commissioners Sanjay Patil and Shinde and Maponi Asha Korke transferred

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Mumbai High Court | शिवसेना खासदार संजय राऊतांवर छळवणुकीचा आरोप करणाऱ्या महिलेला हायकोर्टाकडून ‘दिलासा’

ATM Transaction Fee | बदलला एटीएममधून कॅश काढण्याचा नियम, जाणून घ्या फ्रीमध्ये किती काढू शकता ‘कॅश’

Pune Rural Police | शिक्रापूर परीसरातील खंडणीखोर वैभव आदकवर अखेर ‘मोक्का’