… तर पोलिस अधिकारी, कर्मचार्‍यांना ५०० रूपये दंडाची शिक्षा

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – पोलिस अधिकारी आणि कर्मचारी कर्तव्यावर हजर असताना कर्तव्य सोडून मोबाईल बघत असताना तसेच बोलताना आढळून आल्यास आता ५०० रूपये दंड होणार आहे. त्याबाबतचा आदेश सोलापूरचे पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांनी काढला आहे.

सोलापूर पोलिस आयुक्‍तालयातील पोलिस अधिकारी आणि कर्मचारी डयुटीवर असताना मोबाईल बघत असतात तसेच काही जण बोलत असल्याचे निदर्शनास आले आहे. कर्तव्यावर असताना पोलिसांनी मोबाईल पाहणे अयोग्य असल्याचे सांगण्यात आले आहे. आगामी काळात पोलिस अधिकारी तसेच कर्मचारी डयुटीवर असताना कर्तव्य सोडून मोबाईल वापरत असल्यास त्यांना ५०० रूपये दंडाची शिक्षा होणार आहे. याबाबतचे आदेश पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांनी दि. १९ जुलै रोजी काढले आहेत. दरम्यान, मोबाईलकडे आता जीवनावश्यक वस्तु म्हणून पाहिले जाते.

महत्वाचे फोन येतात अथवा ई-मेल, व्हॉट्स अ‍ॅपवरून माहिती प्रसारित केली जाते त्यामुळे पोलिसांना मोबाईल वापरू नका म्हणणे अयोग्य आहे. पोलिस अधिकारी व कर्मचारी डयुटीवर असताना मोबाईल वापरतात ते शासकीय कामााठी अथवा अति महत्वाच्या कामासाठी मग त्यांना अशा प्रकारच्या दंडाची शिक्षा करणे योग्य आहे काय असा प्रश्‍न आता निर्माण झाला आहे. याबाबत उलट-सुलट चर्चा चालु आहे.

आरोग्यविषय वृत्त –