महिलासोबत ‘नको त्या’ अवस्थेत आढळला पोलिस अधिकारी, गावकर्‍यांनी धो-धो धुतलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बिहारच्या मधेपुरा येथे एका पोलीस अधिकाऱ्याला महिलेसोबत आक्षेपार्ह स्थितीत आढल्यानंतर गावकऱ्यांनी त्यांना बंदी बनवलं. बिहार पोलीस तेव्हा चक्रावून गेले जेव्हा बंदी बनवलेल्या ASI ला सोडवण्यासाठी DSP आणि SDO आले तेव्हा त्यांना लोकांच्या तीव्र विरोधाचा सामना करावा लागला.

मधेपुरा गावातील Chausa ठाण्यात तैनात असलेल्या सहायक पोलीस उपनिरीक्षक (ASI) प्रभाकर रायला गावातील काही लोकांनी महिलेच्या घरी आक्षेपार्ह स्थितीत रंगे हाथ पकडलं. यानंतर गावकरी प्रचंड भडकले. त्यांनी तिथेच त्यांना बांधून मारहाण केली. जेव्हा ही बातमी उदाकिशुनगंज अनुमंडलचे एसडीओ आणि डिएसपींना समजली तेव्हा ते मोठ्या पोलीस दलासह आरोपी फौजदाराला सोडवण्यासाठी आले.

DSP आणि SDO हे फौजदाराला सोडवण्यासाठी आल्यानंतर गावकऱ्यांचा संतापाचा पारा वाढला. आता हे गावकरी फौजदाराला सोडण्यासाठी तयार नसल्याचं सांगत होते. परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जेव्हा गावकऱ्यांना जेव्हा सांगितलं की, ते फौजदाराला अटक करतील आणि त्याच्या विरोधात कठोर कारवाई करतील तेव्हाच गावकरी तयार झाले.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like