11 पोलीस अधिकाऱ्यांच्या पिंपरी-चिंचवड आयुक्तालयांतर्गत बदल्या !

पुणे/पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये 3 पोलीस निरीक्षक (PI), 2 सहायक पोलीस निरीक्षक, 6 पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश आहे. या बदल्यांचे आदेश पोलीस आयुक्त पद्मनाभन यांनी बुधवारी सायंकाळी दिले आहेत.

बदली झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव कंसात कोठून कोठे
पोलीस निरीक्षक शहाजी नारायण पवार (तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे ते संगणक कक्ष), पोलीस निरीक्षक पांडुरंग बाबासाहेब गोफणे (देहूरोड पोलीस ठाणे ते वाहतूक शाखा), पोलीस निरीक्षक भानुदास आण्णासाहेब जाधव (म्हाळुंगे पोलीस चौकी ते पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट -३), सहायक पोलीस निरीक्षक विजय पांडुरंग गरुड (पिंपरी पोलीस ठाणे ते सायबर कक्ष), महिला सहायक पोलीस निरीक्षक चैत्राली सतिश गवळी (सांगवी पोलीस ठाणे ते संगणक कक्ष), पोलीस उपनिरीक्षक रमेश महादेव केंगार (हिंजवडी पोलीस ठाणे ते नियंत्रण कक्ष), महीला पोलीस उप निरीक्षक प्राची गोरख तोडकर (देहुरोड पोलीस ठाणे ते नियंत्रण कक्ष), पोलीस उप निरीक्षक फारुख याकुब सयद सोलापुरे (चिकळी पोलीस ठाणे ते वाहतूक शाखा), पोलीस उप निरीक्षक विक्रम पासलकर (चाकण पोलीस ठाणे ते नियंत्रण कक्ष), पोलीस उप निरीक्षक विजय जगदाळे (चाकण पोलीस ठाणे ते वाहतूक शाखा), पोलीस उप निरीक्षक सोमनाथ बापूराव हंडाळे (भोसरी पोलीस ठाणे ते वाहतूक शाखा).

आरोग्यविषयक वृत्त –

 

You might also like