पोलीस अधिकाऱ्याकडून आमदार, खासदारांची जीभ छाटण्याची धमकी

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन

आत्तापर्यंत खसदार, आमदार, मंत्र्यांकडून पोलिसांची जीभ छाटण्याची भाषा केल्याचे आपण ऐकले आहे. मात्र, आंध्र प्रदेशातील एका पोलीस अधिकाऱ्याने खासदार आमदारांची जीभ छाटण्याची धमकी दिली आहे. आतापर्यंत आजी-माजी आमदार, खासदारांचे आम्ही फार ऐकून घेतले. पण यापुढे आमच्याविषयी अपशब्द काढणाऱ्या आमदार-खासदारांची जीभच छाटू, अशी धमकी आंध्र प्रदेशातील एका पोलीस अधिकाऱ्यानेने दिली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6b1ef6de-befb-11e8-917b-17e098f7e817′]

या धमकीनंतर तेलगू देसमचे खासदार जे. सी. दिवाकर रेड्डी यांनी या पोलीस अधिकाऱ्याला उद्देशून, मी आव्हान स्वीकारायला तयार आहे. तुम्ही सांगाल तेथे मी येतो, तुमच्या घरी येऊ की गावात येऊ, ते मला सांगा, असे पत्रकार परिषदेत जाहीर केले. त्यांनी ताडीपत्री पोलीस ठाण्यात या अधिकाऱ्याविरुद्ध तक्रारही दाखल केली. पण त्याआधारे पोलिसांनी एफआयआर दाखल केला नसून, खासदार रेड्डी यांच्या तक्रारीची नोंद अदखलपात्र गुन्हा अशीच केली आहे.

एका गावात दोन गटांत या आठवड्यात दंगल झाली होती. त्यावेळी सारे पोलीस शेपूट लावून पळून गेले, असा आरोप खासदार रेड्डी यांनी केला होता. आपणही तेथे उपस्थित होतो. पण पोलीसच शेपूट लावून पळून गेल्याने मलाही स्वत:ला वाचवण्यासाठी तेथून पळ काढावा लागला, असेही त्यांनी म्हटले होते.

[amazon_link asins=’B0796QFHH1′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’76679a52-befb-11e8-acb9-7775f851367a’]

पोलीस अधिकारी माधव यांच्या या धमकीबद्दल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. मात्र अनंतपुरम जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक जी. व्ही. अशोककुमार यांनी याविषयी काहीही बोलण्यास नकार दिला. पोलीस ठाण्याच्या प्रमुखांनी सांगितले की, खासदार रेड्डी यांनी केलेल्या तक्रारीची माहिती आम्ही वरिष्ठांना दिली आहे. त्यांच्याकडून जे मार्गदर्शन होईल, त्याप्रमाणे आपण कारवाई करू.

पोलिसांचे मारेकरी शोधण्यासाठी मोहीम

शोपियां जिल्ह्यात तीन पोलिसांची दहशतवाद्यांनी हत्या केल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी पुलवामा व शोपियां जिल्ह्यात जोरदार शोधमोहीम हाती घेतली असून, घराघरात शिरून तपासणी सुरू आहे, तसेच अतिरेक्यांच्या शोधासाठी रस्त्यांवरून जाणारी सर्व वाहनेही अडवली जात आहेत. पुलवामा व शोपिया या दोन जिल्ह्यांच्या किमान आठ गावांमध्ये जवान मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले आहेत. त्यात लष्कर, केंद्रीय राखीव सुरक्षा दलाचे जवान आणि स्थानिक पोलीस सहभागी झाले आहेत. या गावांमध्ये जाण्याच्या सर्व रस्त्यांवरही अडथळे उभे केले असून, येणाºया-जाणाºया प्रत्येकाची चौकशी व तपासणी केली जात आहे.आज तपासणी सुरू असताना एका गावातील रहिवासी व सुरक्षा दलाचे जवान यांच्यात बाचाबाची झाली. प्रत्येक घरात जवान घुसत असल्याने संतापलेल्या काही लोकांनी जवानांवर दगडफेक केली.

कोल्हापूर | दादांच्या बॉडीगार्ड्सची दादागिरी, महापौरांना धक्काबुक्की