Police Patil | पोलीस पाटील पदासाठी 12 वी हवीच ! 10 वी पास उमेदवारांची नियुक्ती रद्द; ‘मॅट’चा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Police Patil | सातारा (Satara) येथील खटाव तालुक्यातील भांडेवाडी गावाचा पोलीस पाटील (Police Patil) म्हणून संगीता विजय फडतरे यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणाने maharashtra administrative tribunal court (MAT Court) रद्द केली आहे. नियमानुसार दहावी आणि बारावी पास उमेदवार असतील तर त्यावेळी बारावी पास उमेदवाराला प्राधान्य देणे गरजेचे असेही मॅटने म्हंटले आहे. २८ जानेवारी २०१९ रोजी संगीत फडतरे यांची नियुक्ती करण्यात आली होती. याविरोधात रोहिणी संदीप फडतरे यांनी मॅटमध्ये धाव घेतली.

 

पोलीस पाटील (Police Patil) पदासाठी झालेल्या परीक्षेत रोहिणी यांना लेखी परीक्षेत ५१ गुण व तोंडी परीक्षेत १३ गुण, असे एकूण ६४ गुण मिळाले. तर संगिता फडतरे यांना लेखी परीक्षेत ५० व तोंडी परीक्षेत १४ गुण, असे एकूण ६४ गुण मिळाले. त्यानंतर १८ जानेवारी २०१८ रोजी दोघींनाही सर्व कागदपत्रे घेऊन प्रशासनाने हजर राहण्यास सांगितले. २०१४ च्या अध्यादेशानुसार उमेदवारांना जर समान गुण मिळाले असतील तर त्यातील उच्च शिक्षित उमेदवाराला प्राधान्य देण्यात येते. मात्र, संगीता यांची नियुक्ती करण्यात आल्याने रोहिणी यांनी मॅटमध्ये धाव घेतली. यावर मॅट सदस्य ए. पी. कुऱ्हेकर (MAT Member A. P. Kurhekar) यांच्यासमोर सुनावणी झाली. (Police Patil)

 

दरम्यान तत्पुर्वी, रोहिणीने सातारा उप विभागीय दंडाधिकारी (SDO) दादासाहेब कांबळे यांच्याकडेही याबाबत पाठपुरावा केला होता. संगिता दहावी उत्तीर्ण आहे. तिने दहावीनंतर सहायक परिचारिका मिडवाइफरीचा कोर्स केला आहे. हा कोर्स बारावीच्या समकक्ष नाही. संगीताकडे एमएससीआयटीचे प्रमाणपत्र आहे. हे प्रमाणपत्र शासनमान्य कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटकडून जारी झालेले नाही. त्यामुळे संगिता या पदासाठी पात्र नाही, असा दावाही रोहिणीने केला होता. मात्र याकडे दुर्लक्ष करत एका वर्षाने संगीता यांची संगिता पोलीस पाटील पदी नियुक्ती केली. (Police Patil)

 

‘कागदपत्रांवर आक्षेप नोंदवूनही एसडीओने केले दुर्लक्ष’

रोहिणी बारावी उत्तीर्ण झाली असून तिच्याकडील एमएससीआयटीचे प्रमाणपत्र शासन मान्य इन्स्टिट्यूटकडून जारी झालेले आहे. रोहिणीने संगीताबाबत एसडीओंकडे आक्षेप नोंदविला होता. त्याकडे एसडीओ यांनी दुर्लक्ष करत संगीताची पोलीस पाटीलपदी नियुक्ती केली. त्यांनी ही नियुक्ती करताना डोके वापरले नाही, असा ठपका ठेवत मॅटने संगीता यांची नियुक्ती रद्द केली आहे. तसेच रोहिणी यांची एका महिन्यात पोलीस पाटीलपदी नियुक्ती करावी, असे आदेश दिले आहेत. राज्य शासनाकडून अँड. अशोक चौगुले (Adv. Ashok Chowgule) यांनी बाजू मांडली, तर अँड. देवकर (Adv. Devkar) यांनी रोहिणी यांच्या बाजूने युक्तिवाद केला.

 

Web Title :-  Police Patil | 12th is required for Police Patil post! Cancellation of appointment of 10th pass candidates; maharashtra administrative tribunal court (MAT Court) crucial decision

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

MSME साठी मिळू शकते 1 कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज, SIDBI ने केला Google सोबत करार; जाणून घ्या कसा अन् कोणाला होणार फायदा

IPS Vidya Kulkarni | वरिष्ठ आयपीएस अधिकारी विद्या कुलकर्णी, नवल बजाज यांची CBI च्या सह संचालकपदी नियुक्ती

Anti Corruption Bureau Mumbai | महिला उपजिल्हाधिकार्‍यासह तिघे 1.20 लाखाची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात, प्रथमच वेगळ्या प्रकारे रचला ‘सापळा’; प्रचंड खळबळ