वीस हजारांची लाच घेताना पोलीस पाटील एसीबीच्या ताब्यात

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन

आत्महत्येचे प्रकरण मिटवण्यासाठी गावच्या पोलीस पाटलाला वीस हजारांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई औरंगाबाद विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने आज (मंगळवार) गंगापूर तालुक्यातील बोलथान येथे केली.

जब्बार सत्तार पठाण (वय-४४ रा. बोलथान, ता. गंगापुर, जि. औरंगाबाद) असे अटक करण्यात आलेल्या पोलीस पाटलाचे नाव आहे. याप्रकरणी ३० वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली होती.
[amazon_link asins=’B07417987C,B07D9G1GHB’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’bcb03218-b03c-11e8-bb6f-0f14aea227b7′]

तक्रारदार यांच्या बहीणीच्या पतीने आत्महत्या केली असून शिलेगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मयत म्हणून नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणात तक्रारदार व त्यांच्या बहीणीवर गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच शिलगाव पोलिसांना सांगून प्रकरण मिटवण्यासाठी पठाण याने वीस हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांनी याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. पथकाने आज सपाळा रचून पोलीस पाटील पठाण याला वीस हजार रुपयांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले. जब्बार पठाण याचेवर शिलेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठी बातम्या तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा
policenama App … प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट