चारित्र्याच्या संशयावरून पोलीस पाटलाने केला पत्नीचा खून

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन – चारित्र्यावरील संशयातून विहिगाव येथील पोलीस पाटलाने चारित्र्याच्या पत्नीचा साडीने गळा आवळून खून केल्याची घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली.

कुसुम पुरुषोत्तम भांबूरकर (५०)असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर पोलीस पाटील पुरुषोत्तम भांबूरकर याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रहिमापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विहिगाव येथे कुसुम भांबुरकर ही महिला आपल्या राहत्या घरात मृतावस्थेत पडल्याची माहिती रहिमापूर पोलिसांना शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी पती पुरुषोत्तम भांबूरकर याला ताब्यात घेतले. तथापि, त्याच्याकडून याप्रकरणी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र शनिवारी पोलीस उपनिरीक्षक आशिष चौधरी यांच्या पथकाने पोलिसी खाक्या दाखवताच त्याने तो बोलू लागला.

चारित्र्याच्या संशयावरून वारंवार भांडण
भांबूरकर दाम्पत्याचे वीस वर्षांपासून वारंवार भांडण होत होते. ते दोघे वेगवेगळ्या घरांत राहत होते. शुक्रवारी कडाक्याच्या भांडणानंतर पुरुषोत्तमने कुसुमचा तिच्याच साडीने गळा आवळून खून केला.

You might also like