Police Patil Problems | राज्यातील पोलीस पाटलांसाठी दिलासादायक बातमी ! मानधनात होणार वाढ; मंत्रिमंडळ उपसमितीस प्रस्ताव सादर

पोलिस पाटलांच्या प्रलंबित असणाऱ्या मागण्या (police patil problems) बाबत तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश

सातारा / फलटण : पोलीसनामा ऑनलाइन – गावातील शांतता आणि सुव्यवस्थेची जबाबदारी पार पाडणारे गावचे पोलिस पाटीलच मानधनाच्या प्रतीक्षेत (Police Patil Problems) आहेत. गेल्या दीडवर्षापासून त्यांना वाढीव मानधनाचा दमडाही मिळालेला नसल्याने स्वत:च्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठीच त्यांना रोजगार शोधावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील पोलिस पाटलांच्या (Police Patil) प्रलंबित असणाऱ्या मागण्या बाबत तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश देताना विधानभवनातील बैठकीचा अहवाल समितीकडे पाठविण्याच्या सूचना विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी संबंधित अधिकाऱ्याना दिल्या आहेत.

राज्यातील पोलीस पाटलांच्या (Police Patil) मागण्या मंत्रिमंडळ उपसमिती समोर असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याबाबत तातडीने निर्णय घेण्याच्या सूचना विधान परिषदेचे अध्यक्ष (सभापती) रामराजे नाईक-निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांनी दिले आहेत.

पोलिस पाटलांच्या प्रलंबित मागण्यांबाबत विधानभवन येथील दालनामध्ये विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि.9) रोजी बैठक झाली.
त्यावेळी, पोलिस पाटलांचे मानधन वाढवून प्रति महिना पंधरा हजार रुपये करण्याची मागणी मंत्रिमंडळ उपसमितीसमोर ठेवण्यात आली आहे.
या विषयावर बैठकीत चर्चा होऊन याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन गृह विभागाचे सचिव संजय सक्सेना यांनी दिले आहे.

या झालेल्या बैठकीदरम्यान उपस्थित असणारे पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष आणि सदस्यांनी पाेलिस पाटलांचे प्रश्न मांडले आहेत.
दरम्यान, पोलिस पाटील हा ग्रामीण भागात (गावामध्ये) कार्यरत असणारा प्रशासनाचा एक महत्त्वाचा घटक आहे.
यामुळे पोलीस पाटलांना स्व-संरक्षणासाठी शस्त्र परवाना देणे
आणि पोलिस पाटील नेमणूक नूतनीकरण कायमचे बंद करण्या बाबत मागणी योग्य असून,
पोलिस पाटलांची नेमणूक ही परीक्षा घेऊन केलेली असल्याने त्यांना नूतनीकरणाची अट ठेवण्याची आवश्यकता नाही.
असे स्पष्ट करीत त्या संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे निर्देश देखील विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिले आहेत.
यावेळी बैठकीत अतिरिक्त पोलिस महासंचालक संजीव सिंघल, गृह विभागाचे उपसचिव युवराज अजेटराव यांची प्रमुख उपस्थिती होती.
याबरोबरच पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे-पाटील,
पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष हणमंतराव सोनवलकर-पाटील,
सातारा जिल्हाध्यक्ष प्रदीप गाढवे, पुणे जिल्हाध्यक्ष साहेबराव राळे,
सातारा जिल्हा सल्लागार सोमनाथ जगताप,
फलटण तालुकाध्यक्ष शांताराम काळेल, उपाध्यक्ष नंदकुमार खताळ व सुनील बोराटे, दीपक राऊत, अमोल पाचपुते, दत्तात्रय वाल्हेकर, शांताराम सातकर उपस्थित होते.

READ ALSO THIS :

Aurangabad News | औरंगाबादमध्ये वीज कोसळून युवतीचा दुर्देवी मृत्यू, 1 जण गंभीर जखमी

BCCI Big Announcement | इंग्लड दौऱ्यानंतर रंगणार आयपीएलचा थरार; बीसीसीआयने केली मोठी घोषणा

Congress Leader Sachin Pilot : भाजपवासी झालेल्या ‘या’ महिला नेत्याचा मोठा दावा, म्हणाल्या – ‘सचिन पायलट यांच्याशी बोलणं झालंय, ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील’