लाॅकडाउन काळात व अतिवृष्टीत केलेल्या कार्याबद्दल पोलिस पाटलांचा गौरव

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना महामारीच्या काळात व तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. या परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था राखण्यात अतिशय मोलाची मदत करणारे पोलीस पाटील यांना कोरोना योद्धा म्हणून बारामती उपविभागीय अतिरिक्त पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते व इंदापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्या हस्ते इंदापूर येथे गौरविन्यात आले.

पोलिस व नागरिक यांच्यातील दुवा म्हणून पोलीस पाटील हे निष्पक्षपणे काम करत असतात. त्यांच्या कामामुळे पोलिसांवरील ताण काही प्रमाणात कमी होत असतो. व तात्काळ खबर त्यांना मिळत असते. त्यामुळे पोलीस पाटलांचे कार्य उल्लेखनीय आहे. कोरोना महामारी व अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत पोलीस पाटील जीवाची पर्वा न करता उत्कृष्टपणे कार्य करत आहेत. त्यामुळे त्यांचा सन्मान करताना समाधान होत असल्याचे मिलिंद मोहिते यांनी सांगितले. इंदापूर पोलीस ठाण्याच्या वतीने हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.

यावेळी पोलीस पाटील संघटनेच्या वतीने अध्यक्ष अनिल भांगे, सचिव अरुण कांबळे, खजिनदार सुनील राऊत, माजी अध्यक्ष विजय करे यांच्या हस्ते मिलिंद मोहिते यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश लोकरे, बिराप्पा लातुरे, सुशील लोंढे, दाजी देठे, गणेश झरेकर, रोशन मुटेकर, विजय झारगड, काकासाहेब पाटोळे, महेश माने, शुभांगी खंडागळे, पोलीस पाटील ज्योती भोसले, शैलजा पाटील, पल्लवी देवकर, पुनम जावळे, रेश्मा भिसे उपस्थित होते.