धक्‍कादायक ! उष्माघाताने पोलिस कर्मचार्‍याचा मृत्यू

वर्धा : पोलीसनामा ऑनलाईन – वर्धा जिल्ह्यातील समूद्रपूर तालुक्यातील उमरी येथे कामासाठी आलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातील बेला पोलीस ठाण्यात ते कार्यरत होते.

बाळकृष्ण इवनाथे असे मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

इथनावे हे नागपूर जिल्ह्यातील बेला पोलीस ठाण्यात कार्यरत होते. ते तेतून दुचाकीने वर्ध्याला येत होते. त्यावेळी रखरखत्या उन्हात ते जात असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांनी दुचाकी थांबवून झाडाचा आसरा घेण्याचा प्रयत्न केला.

उमरी कुल्रा बसथांब्याजवळ हा प्रकार घडला. त्यावेळी बसस्थानकावरील काही लोकांना ते झोपून असल्याने शंका आली. त्यांच्या जवळ जाऊन पाहिल्यावर संशयाने समूद्रपूर पोलीसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी आल्यावर पोलिस शिपायाने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात ही माहिती दिली. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. शवविच्छेदन अहवालानंतर त्यांचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचे समोर आले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like