home page top 1

पोलीस कर्मचाऱ्याची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – नागपूर शहर पोलीस दलातील पोलीस कर्मचारी विकास गुडधे (४२) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

विकास गुडधे हे राणा प्रतापनगर पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत होते. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजून आलेले नाही. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या बाबत माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. अलीकडील काळात पोलीस आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. विकास गुडधे यांनी नेमक्या कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली याची माहिती घेण्याचे काम चालू असल्याचे सांगण्यात आले आहे.

Loading...
You might also like