कारच्या भीषण अपघातात पोलीस कर्मचारी जागीच ठार, नगरसेवकासह ४ जखमी

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – सिन्नर-शिर्डी रस्त्यावर मारुती झेन आणि फॉर्च्युनर कारमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत वावी पोलीस ठाण्याचे वाहतूक कर्मचारी जागीच ठार झाले तर, मुंबईतील एका नगरसेवकासह चार जण जखमी झाले आहेत. हा अपघात सिन्नर – शिर्डी रस्त्यावरील देवपूर फाट्याजवळ पहाटे साडेचार वाजता घडला.

रवींद्र संपत जाधव (वय ३३) असे अपघातात मृत्यु पावलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
वावी पोली ठाण्यातील वाहतूक पोलीस कर्मचारी जाधव हे झेन कारमधून वावीकडून सिन्नरकडे जात होते. यावेळी समोरुन भरधाव वेगाने फॉर्च्युनर कार आली. देवपूर फाट्याजवळ कारने झेनला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, त्यात झेनचा चेंदामेंदा झाला. अपघातानंतर फॉर्च्युनरही रस्त्यावरुन खाली गेली. या अपघातात जाधव यांचा जागीच मृत्यु झाला. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगा असा परिवार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

#YogaDay2019 : मनशांतीसाठी योगासन हा सर्वात चांगला पर्याय

या फळांचे ज्यूस घेतल्याने नष्ट होतील गंभीर आजार

रात्री तुळशीची पाने टाकून दूध घ्या, होतील हे फायदे

हृदय निरोगी राहण्यासाठी घ्यावा ‘हा’ आहार