गुंडाच्या हल्ल्यात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन 

अचलपूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी शांतीलाल पटेल यांच्यावर मंगळवारी पहाटे अचलपूर शहरातील कुख्यात पाच ते सात गुंडांनी लोखंडी रॉड व सलाखीने हल्ला करुन त्यांची हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तिघांना अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, सोमवारी रात्री गस्त घालत असताना पोलीस उपनिरीक्षक शुभांगी ठाकरे यांनी सात ते आठ आरोपींना दारू पित बसलेले असताना पाहिले. त्यांना पाहताच काही जण तिथून पळाले, तर काहींना पोलिसी खाक्या दाखविला व काही वेळा नंतर सोडून देण्यात आले. या आरोपींनी आपल्याला मारहाण केल्याचा राग मनात धरून पोलीस उपनिरीक्षक शुभांगी ठाकरे हिचा पाठलाग केला. पण त्या पहाटेपर्यंत या आरोपींना कुठेच दिसल्या नाहीत.
[amazon_link asins=’B071HWTHPH,B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’83bfb011-b006-11e8-b5bc-d130497385aa’]
त्याचवेळी पोलीस स्टेशनमधून घरी जात असलेल्या पोलीस कर्मचारी सहायक पोलीस उपनिरीक्षक शांतीलाल चुणीलाल पटेल (५२) यांना अडवून रॉड व सलाखीने डोक्यावर वार केले. यामध्ये शांतीलाल पटेल गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. तसेच यातील तीन कुख्यात आरोपींना पोलिसांनी अटक केली असून अधिक आरोपींचा शोध घेतला जात आहे.

सांगली जिल्ह्यातील वीस टोळ्यांमधील शंभर जणांविरोधात हद्दपारीचा प्रस्ताव

या घटनेची माहिती मिळताच अमरावती जिल्ह्या रुग्णालयात पोलीस उपअधीक्षक गृह शिरीष राठोड स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सदानंद मानकर व किरण वानखडे यां अधिका-यांनी घटनास्थळी भेट दिली आहे, या आधी चादुर रेल्वे पोलीस स्टेशनचा सतीश मडावी या पोलीस कर्मचाऱ्यावर सुद्धा २७ मे ला अशाच प्रकारे हल्ला झाला होता त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेला तीन महिने होत नाही तर ही दुसरी घटना जिल्ह्या मध्ये घडली आहे.

मुंडन करुन अल्पवयीन मुलीची नग्न धिंड काढली