Police Personnel Died In Accident | दोन दुचाकींची समोरासमोर धडक, पोलीस कर्मचाऱ्यासह दोघांचा मृत्यू

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – Police Personnel Died In Accident | दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे. हा अपघात शनिवारी (दि.20) दुपारी चांदूरबाजार-अमरावती मार्गावर बोराळा गावाजवळ झाला. शरद जनबंधू असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून ते ब्राह्मणवाडा थळी पोलीस स्टेशन येथे चालक पदावर कार्यरत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, चांदूरबाजार पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रेल्वे क्रॉसिंग पासून काही अंतरावरच दोन्ही दुचाकींची समारोसमोर धडक झाली.
अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही दुचाकीवरील चालक घटनास्थळीच ठार झाले.
बुलेटस्वार (एम एच 27 डीजी 5332) पोलीस कर्मचारी शरद जनबंधू हे आपल्या घरी अमरावती येथे जात होते. दरम्यान, विरुद्ध दिशेने येणाऱ्या टीव्हीएस दुचाकी (एमएच 27 सीडी 3385) गाडीची धडक जनबंधू यांना बसली.

मृतांमध्ये एकजण चांदूरबाजार तालुक्यातील देशखेड येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.
अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. मार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.
नागरिकांच्या मदतीने अपघातातील मृतकांना रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.
तसेच रस्त्याच्या मधोमध असलेल्या दोन्ही दुचाकींना रस्त्याच्या बाजूला करण्यात आले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Lok Sabha Election In Maharashtra | यंदाच्या निवडणुकीत कोकणातून ‘धनुष्यबाण’ तर साताऱ्यातून ‘घड्याळ’ हद्दपार, जाणून घ्या या निवडणूकीतील 10 मोठ्या राजकीय घटना

Baramati Lok Sabha Election 2024 | अजितदादांचा डमी अर्ज नामंजूर, बारामतीमध्ये नणंद विरूद्ध भावजयी अशीच लढत