धक्‍कादायक ! पोलिस कर्मचार्‍याकडून २ सावत्र मुलांवर ‘बेछुट; गोळीबार, दोघांचाही मृत्यू

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – पोलीस दलात कार्य़रत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या दोन सावत्रमुलांवर गोळीबार केल्याची धक्कादाय घटना आज (शुक्रवार) नाशिकच्या अश्वमेधनगर परिसरात घडली आहे. या घटनेत दोन्ही मुलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून घटनेनंतर पोलीस कर्मचारी पोलीस ठाण्यात स्वत:हून हजर झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
Police

सोनू नंदकिशोर चिखलकर (वय-२५) आणि शुभम नंदकिशोर चिखलकर (वय-२२) असे मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. तर संजय अंबादास भोये याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा प्रकार आज दुपारच्या सुमारास घडला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सोनू चिखलकर हा नौदलात कार्य़रत होता. तर शुभम नाशिकमधील एका खासगी कंपनीत कामाला होता.

संजय भोये हा उपनगर पोलीस ठाण्यात पोलीस नाईक म्हणून कार्य़रत आहे. संजय भोये आणि त्यांच्या मुलामध्ये कौटुंबीक वाद होते. हे वाद विकोपाला गेल्याने संजय यांनी आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्वरने मुलांवर तीन गोळ्या झडल्या. संजने गोळी झाडल्यानंतर दोन्ही मुले घाबरून बाथरुममध्ये लपली. मात्र, या गोळीबारात दोन्ही मुलांचा मृत्यू झाला.

घटनंतर संजय भोये स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. हा प्रकार समजताच पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

आरोग्यविषयक वृत्त-
भारतातील ‘या’ ७ योगगुरूंचे जगभरात ‘फालोअर्स’, जाणून घ्या त्यांच्याबद्दल
लहान मुलांनाही शिकवा ही “योगासन” होतील फायदे
लहान मुलांची उंची वाढण्यासठी करा हे नैसर्गिक उपाय
मानसिक आरोग्य जपण्यासाठी झोप आहे महत्वाची

You might also like