१० हजाराची लाच घेताना पोलीस अधिकाऱ्यासह पोलीस कर्मचारी अटकेत

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन

तक्रारदारच्या मालकीच्या जागेवरील पार्किंग सुरू ठेवण्याकरिता व त्याचेवर कारवाई न करण्याकरिता २० हजाराच्या लाचेची मागणी करून १० हजाराची लाच घेताना एका सहाय्यक पोलीस उप निरीक्षकासह एका पोलीस कर्मचाऱ्याला ठाण्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने गुरुवारी रात्री ११.३० वाजता अटक केली आहे. ते दोघेही पोलीस नारपोली पोलीस स्टेशन मधील आहेत.

[amazon_link asins=’B078MZR5WH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7868fef1-8bd2-11e8-ad8d-3b179251614a’]

संतोष म्हाळू इरणक (पोलिस नाईक बक्कल क्रमांक ३४९४, नारपोली पोलिस स्टेशन) आणि बजरंग सीताराम ढोकरे (सहा. पोलिस उप निरीक्षक, नारपोली पोलीस स्टेशन) अशी कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तक्रारदार यांच्या मालकीच्या जागेवरील पार्किंग सुरू ठेवण्याकरिता व त्याचेवर कारवाई न करण्याकरिता पोलिसांनी २० हजाराच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती १० हजार रुपयाची लाच द्यायचे ठरले. गुरुवारी ११.१५ वाजता लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला. सरकारी पंचा समक्ष पोलिसांनी १० हजाराची लाच घेतली. त्या नंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई चालू असल्याचे एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तक्रारदाराने या प्रकरणी बुधवारी तक्रार नोंदवली होती. पडताळणी केल्यानंतर कारवाई करण्यात आली.