अपघातात पोलिस कमर्चारी जखमी 

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन  – आळंदी जवळील देहू फाटा येथे कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसाला वेगाने येणाऱ्या मोटारीने धडक दिल्याने ते जखमी झाले. ही घटना शनिवारी घडली.

रवींद्र सरमहाले (रा. पंचमसृष्टी अपार्टमेंट, तापकीर नगर, आळंदी) असे जखमी झालेल्या पोलिसाचे नाव आहे. तर मारुती सुझुकी मोटार क्रमांक (एमएच १८, एसी ११४७) वरील चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (ता.२९) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास पोलीस कर्मचारी सरमहाले हे आळंदी जवळील देहू फाटा येथे कर्तव्यावर होते. त्यावेळी तेथे आलेल्या मोटारीस पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला. मात्र, चालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून मोटार भरधाव वेगाने चालवून पोलीस कर्मचारी सरमहाले यांना धडक देऊन जखमी केले. तसेच अपघाताच्या ठिकाणी न थांबता पळून गेला. तपास दिघी पोलिस करत आहेत.

धुळ्यातील अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन गुजरात मध्ये अत्याचार ; चौघांवर गुन्हा