Police Personnel Suspended In Pune | आमदार महेश लांडगे यांच्याशी गैरवाजवी भाषा, पोलीस कर्मचारी निलंबित

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Police Personnel Suspended In Pune | भोसरीचे (Bhosari Vidhan Sabha) आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांच्याशी फोनवर गैरवाजवी शब्द वापरुन आक्षेपार्ह व्यक्तव्य केल्याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यातील (Lonikand Police Station) पोलीस कर्मचारी अमित अरुण देशमुख (Amit Arun Deshmukh) यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर (Vijaykumar Magar DCP) यांनी हे आदेश काढले आहेत. (Police Personnel Suspended In Pune)

मिळालेल्या माहितीनुसार, एका जमिनीच्या वादाबाबत राजेश सांकला, रमेश कावेडिया, जगदीशप्रसाद आगरवाल यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला होता. या तक्रार अर्जाची चौकशी देशमुख यांच्याकडे होती. यासंदर्भात माहिती घेण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी फोनवर संपर्क साधला.

अमित देशमुख यांनी महेश लांडगे हे लोकप्रतिनिधी असताना कोणतेही भान न ठेवता मराठी माणुस
हा एक ब्लॅकमेलर आहे, अशा प्रकारचे गैरवाजवी शब्द वापरुन त्यांच्याशी आक्षेपार्ह भाषा केली.
याबाबतची तक्रार आल्यानंतर अमित देशमुख यांची खात्यामार्फत चौकशी करण्यात आली.
त्यात ते दोषी आढळल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

शिरुर लोकसभा मतदारसंघात विद्यार्थ्यांची प्रभात फेरीद्वारे मतदान जनजागृती

Baramati Lok Sabha Election 2024 | बारामती लोकसभा मतदार संघात मतदार जागृती उपक्रमांचे आयोजन

वंचित पुण्यातून उमेदवार देणार, वसंत मोरेंना उमेदवारी देण्यास स्थानिक नेत्यांचा विरोध

पिंपरी : उद्योगपती मालपाणी कुटुंबाचा सदस्य असल्याचे भासवून महिलेची 93 लाखांची फसवणूक, आरोपी गजाआड

Pune Cheating Fraud Case | नोकरी लावण्याच्या बहाण्याने पुण्यात युवकाला 28 लाखांचा गंडा, दाम्पत्यावर FIR

Pune Traffic Police Action On Modified Silencers | ‘बुलेट राजा’वर वाहतूक शाखेची वक्र दृष्टी! 619 बुलेट वर कारवाई, कर्कश आवाजाचे सायलेन्सर जप्त

विश्रांतवाडी, वानवडी, हडपसर परिसरात घरफोडी, सोन्याच्या दागिन्यासह दोन कारची चोरी

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटात
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या इतिहासाला उजाळा; अभिनेते रणदीप हुडा यांनी पाळला
पुनीत बालन यांना दिलेला शब्द (Video)