
Police Personnel Suspended | तमाशाच्या फडात नाचणारा सहायक पोलिस फौजदार (ASI) निलंबित, दुसराही रडारवर
जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – Police Personnel Suspended | जळगाव तालुक्यातील खेडी बुद्रुक येथे तमाशाच्या (Tamasha) फडात नाचणारा सहायक पोलिस फौजदार भटू नेरकर (ASI Bhatu Nerkar) याच्यावर पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे (SP Dr. Praveen Mundhe) यांनी निलंबनाची कारवाई आहे. याच प्रकरणात जळगाव तालुका पोलीस ठाण्याचा (Jalgaon Taluka Police Station) आणखी एक कर्मचारी रडारवर असून त्याची चौकशी सुरु असल्याची माहिती डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली.
गेल्या महिन्यात निवृत्ती नगरमध्ये भावेश उत्तम पाटील (Bhavesh Uttam Patil) या तरुणाचा खून (Murder) झाला होता. याप्रकरणात भूषण सपकाळे आणि मनीष पाटील या दोघांना अटक (Arrest) करण्यात आली आहे. या घटनेच्या काही दिवस आधी भूषण सपकाळे याच्या गावात तमाशाचे आयोजन करण्यात आले होते. तेथे भटू नेरकर यांच्यासह एका कर्मचाऱ्याने हजेरी लावली होती. ते दोघे तमाशाच्या फडात नाचल्याचा आरोप झाला होता.
दरम्यान, भटू नेरकर यांचा तमाशात नाचतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
यानंतर पोलीस अधीक्षकांनी चौकशी लावली होती.
ही चौकशी पूर्ण झाल्यानंतर भटू विरभान नेरकर यांना निलंबित (Police Personnel Suspended) करण्यात आले.
तर दुसऱ्या कर्मचाऱ्याची देखील कसून चौकशी सुरु आहे.
त्याचा या प्रकरणात नेमका काय सहभाग आहे? यात तथ्य आढळल्यास त्याच्यावरही कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी माध्यमांशी बोलताना दिली.
Web Title :- Police Personnel Suspended | jalgaon police video of dancing in tamasha goes viral police personnel suspended
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Accident | हडपसर-सासवड रोडवर कंटेनर व शिवशाही बसचा भीषण अपघात
Pune Crime | पोलिसाच्या डोक्यात सिमेंट ब्लॉक घालून जीवे मारण्याचा प्रयत्न; विमाननगर परिसरातील घटना