नांदेड : ‘त्या’ समतानगर गडातील गुटखा व्यापाऱ्याच्या घरावर पोलिसांचा छापा

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन – तालुक्यातील लहान मुलाला जरी विचारले गुटखा कुठं भेटतो तर तो समतानगर हेच ठिकाण सांगेल. समतानगरहून नांदेड व इतर तीन तालुक्यात गुटखा पार्सल होतो. गुटखा विक्रीचे समतानगर हे केंद्र बिंदू असल्याचे माहीत असून देखील कार्यवाही होत नाही, यामुळे भोकर शहरातील नागरिकांत नाराजी पसरली होती. भोकरच्या अवैध गुटखा व्यापाऱ्यांचा माल भेटता भेटेना अशी बातमी पोलीसनामा पोर्टल वर प्रकाशित होताच काही महिन्यात पोलिसांनी त्याच्या पहारा करून कार्यवाही करून सफलता मिळवली. अन्न सुरक्षा अधिकारी जिंतूरकर यांनी देखील त्याच ठिकाणी मोठ्या टीमसह जाऊन धाड टाकली पण त्यांच्या हाती त्या वेळी काही लागले नव्हते.

अन्न व औषध प्रशासनाच्या जिंतूरकर यांच्या पथकाने सुरू केलेल्या धडक कार्यवाहीत भोकर शहरात समता नगर भागात केलेल्या कार्यवाहीत व अन्य दुकानात कुठल्याच प्रकारचा माल मिळाला नसल्याचे पथकाच्या प्रमुखांनी पोलीसनामाशी बोलताना त्या वेळी सांगितले. स्थानिक अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून गुटखा मालाची विल्हेवाट अगोदर लावल्याचा अंदाज नागरिकांतून व्यक्त होत आहे. ते खरे होते पण आता स्थानिक अधिकाऱ्यांनीच कार्यवाही केल्यामुळे शेख रज्जाक शेख हब्बीब (वय ३८ वर्ष) याच्या वर कार्यवाही झाली आहे.

नांदेड जिल्ह्यातील भोकर हे नावाजलेले शहर आहे. ह्या शहरात असलेले समतानगर गुटख्याचे गड बनलेला आहे. या ठिकाणी अन्न व औषध प्रशासन गुटखा विक्रीवर कार्यवाही करण्यासाठी आले आहेत अशी गुटखा विक्रेत्यांना कुणकुण लागली. यामुळे गुटखा प्रतिबंधक पथकाचे धाड सत्र फेल गेले होती. पण भर दुपारी पोलिसांनी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या गाडीमधून जाऊन उमेवार,तेलंग,सोनपारखे सोबत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश भाले यांच्या सह अनेक पोलीस अधिकारी कार्यवाही मध्ये शामिल होते. त्या वेळी ५०९४० रुपयांचा माल पोलिसांच्या हाती लागला तो माल आरोपीच्या छोट्या भावाच्या हाताने व स्वतः पोलीस अधिकाऱ्यांनी मिळून गाडीत भरलेले व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले होते. त्यामुळे मुख्य आरोपीला देखील त्या गाडी बसून पोलीस स्टेशन च्या बाजूला असलेले उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथे त्यांना बसवले गेले.

गुटखा विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांशी हात मिळवणी करून पोलीसांनी अवैध गुटख्याचे धंदे करण्याची परवानगी दिली की काय अशी चर्चा भोकर शहरात मध्ये सुरू होती. पण दि ०६ जून २०१९ रोजी भोकर पोलिसांनी केलेली कार्यवाही ही त्या गुटखा विक्रेत्यांवर एक चपराक मारल्यासारखी झाली आहे. तरीही कालच्या कारवाईने जनतेला थोडेफार समाधान वाटले आहे.अधिकाऱ्यांना सर्व प्रकार माहीत असून देखील मुख्य व्यापाऱ्याच्या लाखोच्या मालावर कारवाई का करत नाही, याची शहरात चर्चा सुरु होती.

संबंधित गुटखा विक्री पुर्णपणे बंद करून विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी , अशी मागणी जनतेतून होत आहे . तरीदेखील नागरिकांच्या भावना लक्षात घेता अन्न व प्रशासन अधिकारी यांनी आरोपीस मोठ्यात मोठी कलमे लावली असावी अशी चर्चा भोकर शहरात सुरू आहे.