भाजपा नगरसेवकाच्या ऑर्केस्ट्रा बारवर ‘रेड’, बारबाला व कर्मचाऱ्यांसह 26 जणांना अटक

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – मीरा भाईंदरमधील भाजप नगरसेवकाच्या ऑर्केस्ट्रा बार मध्ये पोलिसांनी धाड मारत या ठिकाणी काम करणाऱ्या बारबाला तसेच अनेक कामगारांना अटक केली आहे. नवघर पोलिसांनी हि कारवाई केली असून या बारमध्ये अर्धनग्न अवस्थेत नाच करणाऱ्या 19 बारबालांना आणि बार चालकासह एकूण 7 कर्मचाऱ्यांना अटक केली आहे.

भाजप नगरसेवक गणेश शेट्टी यांचा अण्णा पॅलेस ऑर्केस्ट्रा बार आहे. या ठिकाणी अश्लील नृत्य आणि पैसे उडवण्याचे काम चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर या ठिकाणी धाड मारली असता ही कृत्ये आढळून आली. त्याचबरोबर या ठिकाणी अवैध वेश्याव्यवसाय देखील सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. या बारवर पूर्वीदेखील अनेक वेळा पोलिसांनी छापा मारून कारवाई केली आहे. त्यानंतर सर्व आरोपींना ताब्यात घेऊन या प्रकरणी एकूण 26 जणांना आरोपी बनविण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक किरण वंजारी आणि त्यांच्या पथकाने याठिकाणी धाड टाकून ही कारवाई केली आहे. त्याचबरोबर पोलिसानी या प्रकरणी गुन्हा देखील दाखल केला आहे.

दरम्यान, या प्रकरणात सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांचे नाव आल्यानंतर यांना कायद्याचे भान आहे कि नाही हा प्रश्न सामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

आरोग्यनामा ऑनलाइन –

Loading...
You might also like