हुक्का पार्लर चालवणारा नगरसेविकेचा जावई फरार

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – मुंबई पोलिसांनी एका हुक्का पार्लरवर धाड टाकत पाच जणांना अटक केली. काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या हुक्का पार्लरवर त्यांनी धाड टाकत ही कारवाई केली. यावेळी हुक्का पार्लरचा मालक मनीष मकवाना हा सध्या फरार असून तो स्थानिक नगरसेविका अनिता पाटील यांचा जावई असल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलिसांना या अनधिकृत हुक्का पार्लरची माहिती मिळाल्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देवीदास हंडोरे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह या पार्लरवर धाड टाकली. एका गाळ्यात हे अनधिकृत हुक्का पार्लर चालवण्यात येत होते. यावेळी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले. यामध्ये या पार्लरच्या व्यवस्थापकासह कॅशियर, वेटर आणि दोन ग्राहकांना अटक करण्यात आली. संकेत सुरेश म्हात्रे (२४) सोमेश महादेव काळे या दोन ग्राहकांना तसेच व्यवस्थापक मुजिबुर खान (२१) रोखपाल रुद्रेश रविंद्र पवार (२२) व वेटर इम्रान शेख यांना ताब्यात घेतले.

त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी हुक्का पार्लरचा मालक मनीष मकवानावर गुन्हा दाखल असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत. त्यामुळे स्थानिक भाजप नगरसेविकेचा हा जावई असल्याने या प्रकरणाची मोठी चर्चा या परिसरात रंगली आहे.

‘या’ १० पैकी काही ‘एक’ खाल्ल्यास शरीरातील रक्‍ताचे (HB) प्रमाण वाढेल, जाणून घ्या

वैवाहिक जीवनात ‘हा’ आहार घ्या अन् घ्या सळसळत्या तारूण्याचा अनुभव, जाणून घ्या

चाळिशीनंतर ‘वजन’ नियंत्रणात आणण्यासाठी करा ‘हे’ ७ सोपे उपाय

‘या’ 2 उपायांमुळे कंबरदुखी होईल ‘गायब’, कधीही होणार नाही त्रास, जाणून घ्या

डोळयांमध्ये काही ‘बदल’ झाल्यास ‘ती’ १० पैकी ‘या’ एका आजाराची लक्षणं, जाणून घ्या

मेंदी अनेक आजारांवर गुणकारी, जाणून घ्या

You might also like