काय सांगता ! होय, वानवडीत Lockdown मध्ये मटका अड्डा ‘तेजी’त, गुन्हे शाखेच्या पोलिसांचा छापा, 5 जणांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना काळात सुरु असलेल्या जुगार आड्ड्यावर पुणे पोलिसांनी छापा टाकून पाच जणांना अटक केली आहे. ही कारवाई हडपसर येथील रामनगर झोपडपट्टी रेल्वे गेटजवळ करण्यात आली.

पुणे शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाऊनमध्ये हडपसरमध्ये जुगार आड्डा सुरु असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस हवालदार कुमावत यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामनगर झोपडपट्टी रेल्वेगेट जवळ सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. त्यावेळी बेकायदेशीर सोरट जुगार खेळणारे आणि जुगार घेणाऱ्या पाच जणांना अटक करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकूण 8950 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींवर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त गुन्हे बच्चन सिंग, पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रिया टिळेकर, पोलीस हवालदार कुमावत, पोलीस शिपाई कोळगे, भांडवलकर, गायकवाड यांच्या पथकाने केली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like