भोसरी, थेरगावमध्ये पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा, 17 जणांवर कारवाई

पिंपरी: पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी-चिंचवड शहरात भोसरी, थेरगाव येथे बुधवारी (दि. 7) दोन वेगवेगळ्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी 17 जुगारींना अटक केली. त्यांच्याकडून 1 हजार 360 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पहिली कारवाई एमआयडीसी भोसरी पोलिसांनी केली. हरिश्चंद्र रूपसिंग राठोड (वय 75), विष्णू संभाजी चव्हाण (वय 56), महादेव नामदेव वाघमारे (वय 48 सर्व रा. भोसरी) आणि त्यांचे इतर सहा साथीदार अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे टेल्को रोड, लांडेवाडी, भोसरी येथील मोकळ्या मैदानात पत्त्यांचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार कारवाई करून 9 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 1 हजार 360 रुपयांचे जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम जप्त केली.

तर दुसरी कारवाई सामाजिक सुरक्षा पथकाने केली. जुगार चालक मालक दुर्गाराम रुपाराम पटेल (वय 45 रा. थेरगाव), रामदास मारुती जांभुळकर (वय 37 रा. जुनी सांगवी), दिलीप बजरंग बारणे (वय 61) , बाबासाहेब सीताराम सूर्यवंशी (वय 48), ज्ञानोबा इश्वर पाटील (वय 40), संजय रोहीदास मोरे (वय 36) , संजय मच्छिंद्र मिसाळ (वय 41), मंगेश सुदाम केदारी (वय 36 सर्व रा. थेरगाव) अशी आरोपींची नावे आहेत. सामाजिक सुरक्षा पथकातील पोलीस नाईक भगवंता चिंधू मुठे यांनी याबाबत वाकड पोलीसात फिर्याद दिली आहे. प्राप्त माहितीनुसार, पवारनगर, थेरगाव येथील मयुर पवार यांच्या बिल्डींगमध्ये जुगार सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली. त्यानुसार बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकून आरोपीना जुगार खेळताना पकडले. पोलीस उपनिरीक्षक संगीता गोडे तपास करत आहेत.