पाबळ येथील जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा, युवराज बगाटेसह 9 जणांना अटक

पुणे : पोलीसनामा ओनलाइन – जिल्ह्यातील पाबळ भागात सुरु असणाऱ्या बड्या जुगार अड्यावर बारामती गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून पर्दाफाश केला आहे. येथून तब्बल साडे नऊ लाखांचा ऐवज जप्त करत नऊ जणांना अटक केली आहे. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे कोणाच्या आशीर्वादाने जुगार अड्डा सुरू होता. तसेच स्थानिक पोलिसांकडून कारवाई का करण्यात आली नाही, असा प्रश्न पोलीस दलात चर्चिलं जात आहे.

युवराज बगाटे याच्यासहा ९ जणांना अटक केली आहे. याबाबत शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे शहरात पोलिसांकडून अवैध धंद्यावर जोरदार कारवाई होत असल्याने हे अवैध धंदे वाले जिल्ह्यात गेल्याची माहिती आहे. दरम्यान शिक्रापूर तालुक्यातील पाबळ परिसरात तीन पत्ते व मटक्याचा जुगार सुरु असल्याची माहिती बारामती गुन्हे शाखेचे विशेष पथकाला मिळाली होती.

त्यानुसार पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, कर्मचारी संदीप जाधव, सुरेंद्र वाघ, स्वप्नील अहिवळे, दशरथ कोळेकर, विशाल जावळे, शर्मा पवार बी त्यांच्या पथकाने याठिकाणी छापा टाकला. त्यावेळी येथून पाबळ येथील युवराज बगाटे याच्यासह पत्ते व मटका खेळणाऱ्या ८ जणांना पकडण्यात आले. पोलिसांनी येथून १ लाख ६५ हजाराची रोकड, ५० हजाराचे १० मोबाईल, महागड्या कार असा ९ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

Visit : Policenama.com