राज्यात अद्यापही ‘छमछम’ सुरू, लेडीज बारवर छापा, 53 ग्राहकांसह 4 बारगर्ल्स ‘गोत्यात’

पनवेल : पोलीसनामा ऑनलाईन – कळंबोली येथील लेडीज बारवर पोलिसांनी छापा टाकून 53 ग्राहक आणि 4 बारबाला यांना अटक केली आहे.  कळंबोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश गायकवाड यांच्या मार्गदर्शनानुसार ही कारवाई करण्यात आली. दोन वर्षांत या बारवर तिसऱ्यांदा कारवाई करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार , शनिवारी रात्री अडीचच्या सुमारास कळंबोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश गायकवाड गस्त घालत असताना  कॅप्टन लेडीज सर्व्हिस बार दोन वाजता परवानगी नसतानाही सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे बारवर पोलिसांनी छापा टाकला असता अश्लील चाळे करून नृत्य सुरू असल्याचे आढळले.  53 ग्राहक आणि 4 बारबाला  यांना अटक करण्यात आली आहे.

भादंवि 294, 114, 34 आणि मुंबई पोलिस कायदा कलम, महाराष्ट्र हॉटेल उपहारगृह अश्लील महिलांचे नृत्य कायदा अधिनियम याप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Visit : Policenama.com

You might also like