पोलिसांच्या छाप्यात दोन मटका किंग गजाआड 

नाशिकरोड : पोलीसनामा ऑनलाईन- जुगार मटक्याच्या नादात संसाराची राख रांगोळी करणाऱ्या दोन मटका चालकांना पोलिसांनी अज्ञाताने दिलेल्या गुप्त माहितीच्या आधारे पकडले आहे. नाशिकरोड येथील  बिटको हॉस्पिटल जवळच्या भाजीमार्केट मध्ये मोकळ्या मैदानात हे मटका किंग मटका घेण्याचे काम करत होते . त्यांच्या विरोधात एका अज्ञाताने पोलिसात माहिती दिली आणि पोलिसांनी त्यांच्यावर अटकेची कार्यवाही केली.

घटनास्थळी पोलीसांनी छापा टाकला असता त्यांना त्या दोघांसहित त्यांच्या जवळ मटक्याचे सामान आणि रोख रक्कम मिळाली. मटक्याच्या सामानावरून पोलीसांना ते मटका घेत असल्याचे स्पष्ट करायला वेळ लागला नाही. त्या दोघांना पोलिसांनी रंगे हात पकडल्याने त्यांना त्यांच्या अटकेच्या विरोधात काहीच बोलता आले नाही. भाजी मार्केट मध्ये अशा खुल्या पध्द्तीने घेतल्या जाणाऱ्या मटक्याचा पोलिसांना सुगावा लागला आणि त्यांनी त्या मटका किंगला अटक केली. आता या बद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. भाजी मार्केट मध्ये अशा प्रकारे मटक्याचा व्यवसाय चालत होता हे नागरिकांना पोलिसांनी कार्यवाही केल्या नंतरच समजून आले आहे म्हणून नागरिकांनी या विषयावर आश्चर्य व्यक्त केले आहे.

भाजी मार्केट मध्ये आज दुपारी पावणे तीनच्या सुमारास हि कार्यवाही केली असून या कार्यवाहीत पोलीसांनी मोसिन हमिद पठाण (२९, रा़ कॅम्परोड, येवलारोड, मनमाड) व बाळू कारभारी खोंड (५०, रा़ दातेचाळ, राजराजेश्वरी जेलरोड) या दोघांना अटक केली आहे. या दोघांकडून पोलिसांनी रोख पैसे आणि मटक्याचे रेकॉर्ड शीट तसेच मटक्याच्या पावत्या जप्त केल्या आहेत. या आरोपींवर पोलिसांनी  जुगार अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

मटक्याच्या घटना शहरो शहरी मोठ्या प्रमाणात घडत असून प्रत्येकच घटना उघडकीस येते असे नाही परंतु पोलिसांनी सक्षमतेने कार्यवाही केल्याने अनेक ठिकाणी मटक्याच्या घटनांना आला बसला आहे. पोलिसांनी  या बद्दल चाफ बसवण्याचा प्रयत्न केला तरी पोलिसांच्या माघारी राजरोजपणे असे व्यवसाय सुरु असल्याचे चित्र अनेक ठिकणी पाहण्यास मिळते. मटक्याच्या व्यसनात अनेकांच्या शेत जमिनी, घर, संसार उधवस्त झाले तरी लोकांचे मटक्याचे व्यसन सुटत नाही म्हणून  मटक्याच्या प्रश्नी गृह खात्याने मोठी राज्यव्यापी कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे.