सलग दुसऱ्या दिवशी पुण्यातील ६ पबवर छापे, १९६ दारूच्या बाटल्या जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – उशिरापर्यंत सुरु असलेल्या पबवर गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी छापे घालून त्यांच्यावर कारवाई केली. उशिरापर्यंत सुरु असलेल्या ६ पबवर रविवारी पहाटे गुन्हे शाखेच्या पथकांनी छापे घालून कारवाई केली. तेथे बेकादेशीरपणे दारू विक्री होत असल्याचे आढळून आल्यावर त्यातील दोन पबमधून साडे चार लाख रुपयांच्या १९६ दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. शनिवारी पहाटे पोलिसांनी ८ पबवर कारवाई केली होती.

चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत ‘प्लेबॉय’ हा पब पहाटे पर्यंत सुरु होता. तेथे मोठमोठ्या आवाजात म्युझिक सुरु होते. डान्स फ्लोअरवर अनेक तरुण तरुणी नृत्य करीत होते. तसेच तेथे बेकायदेशीरपणे दारूची विक्री केली जात होती. पोलिसांनी तेथून साडेतीन लाख रुपयांच्या १४७ दारुच्या बाटल्या जप्त केल्या. तसेच बेकायदेशीरपणे दारु विक्री केल्याबद्दल पबचे ३ मालक, २ मॅनेजर आणि ३ वेटरवर गुन्हा दाखल केला. तसेच डीजेवर कारवाई केली आहे.

लॉडर्स ऑफ ड्रिक्स या येरवड्यातील पबवर पोलिसांनी कारवाई केली. तेथेही बेकायदेशीरपणे दारु विक्री होत असल्याचे आढळून आले. तेथून १ लाख १ हजार ६३५ रुपयांच्या ४९ दारुच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. पबचा मालक, १ मॅनेजर आणि ३ वेटर्सवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय नियमभंग करणाऱ्या बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील २बीएचके पब, केनो पब, मिलर पब, बोटॅनिके पब अशा चार पबवर कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस आयुक्त डाॅ. के. वेंकटेशम, अप्पर आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे, सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप, सकट, शंकर संपत्ते माऊली पवार यांच्या पथकाने केली आहे.

सिने जगत –

अभिनेत्री प्रियंका चोपडा सलमान खानच्या ‘भारत’ चित्रपटाबाबत मोठं वक्‍तव्य

‘या’ ४ ‘टॉप’च्या अभिनेत्रींना ‘सुंदर’ दिसण्यासाठी ‘मेकअप’ची अजिबात नाही गरज

‘या’ 3 ‘बोल्ड’ अभिनेत्रींनी ‘लव्ह’ मॅरेज केल्यानंतर पतीवर केले लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप

‘नक्षली’ होते मिथुन चक्रवर्ती ; भावाच्या मृत्यूनंतर झाले ‘असे काही’ की बनले ‘डिस्को डान्सर’