साताऱ्यात अजंठा हॉटेलवर छापा, सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

सातारा : पोलीसनामा आॅनलाइन – येथील देवी चौकात असणाऱ्या हॉटेल अजंठावर सातारा उपविभागीय पोलीस अधिकारी समीर शेख यांनी छापा टाकला. छाप्यावेळी हॉटेलच्या लॉजिंगमधून पोलिसांनी तीन महिला आणि चार पुरुषांना ताब्यात घेतले. हॉटेल मालक चंद्रकांत राजाराम घोरपडे, हेमंत घोरपडेसह सहा जणांवर याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

देवी चौकात चंद्रकांत राजाराम घोरपडे (रा. केसरकर पेठ, सातारा) यांचे अजंठा नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलमध्येच लॉजिंग असून त्याचा व्यवस्थापक म्हणून श्याम सदाशिव पवार (रा. देवी चौक, सातारा) हा काम पहात आहे. या हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी समीर शेख यांना मिळाली. यानुसार त्यांनी शाहूपुरी पोलिसांच्या मदतीने त्याठिकाणी छापा टाकला.

छाप्यावेळी लॉजच्या खोल्यांमध्ये असणाऱ्या तीन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या महिलांसोबत असणाऱ्या एका पुरुषालाही पोलिसांनी नंतर ताब्यात घेतले. यानंतर पोलिसांनी हॉटेल मालक चंद्रकांत घोरपडे, व्यवस्थापक पवार याच्यासह त्याचठिकाणी उडपी हॉटेलचालकास ताब्यात घेतले. त्या सर्वांना नंतर शाहूपुरी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. याठिकाणी महिलांची चौकशी करण्यात आली.

७० कोटींचं कर्ज देण्याच्या बहाण्याने व्यापाऱ्याला ८ लाखांना गंडा