धुळे : पश्चिम देवपुर पोलीसांनी घरात रंगलेला पत्त्याचा ‘डाव’ मोडला

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील जुगार अड्ड्यावर छापा टाकून पश्चिम देवपूर पोलीसांनी 9 जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच 20 हजार रुपये व 9 दुचाकी आणि जुगाराचे साहित्य ताब्यात घेतले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहरात लपून छुपून पैसे लावून जुगार खेळण्याचे प्रकार सुरु आहे. या प्रकारांमुळे नागरीक हैराण झाले. एका नागरीकाने फोनद्वारे उपविभागिय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांना पश्चिम देवपूर पोलीस हद्दीतील नकाणे रोड, एकविरा नगर गँस गोडावून जवळील लक्ष्मण भिकारी चांगेर यांचे घरात पत्त्यांच्या जुगाराचा खेळ सुरु असल्याचे सांगितले. त्यानूसार पोलीस पथकाने सापळा रचून छापा टाकला. येथून पोलीसांनी 9 जणांसह रोख रक्कम 20 हजार रुपये, जुगार खेळत असलेले साहित्य, दुचाकी, मोबाईल असा एकुण 2 लाख 23 हजार 120 रुपयांचा माल जप्त केला. पुढील तपास पश्चिम देवपूर पोलीस करत आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/