जुगार अड्ड्यावर पुणे ग्रामिण पोलिसांची मोठी कारवाई

पुणे/शिरुर : पोलीसनामा ऑनलाइन – अवैधरित्या चालवण्यात येणाऱ्या जुगार अड्ड्यावर पुणे ग्रामिण पोलिसांनी छापा टाकून 1 लाख 44 हजार 530 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शिरुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मांडवगण फराटा येथे करण्यात आली. पोलिसांनी दहा जणांविरुद्ध शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मांडवगण फराटा येथे हारजितचा जुगार खेळवला जात असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक बारामती यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मांडवगण फराटा येथे छापा टाकून मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी या कारवाईत 60 हजार 30 रुपयांची रोकड, 62 हजार 500 रुपयाचे मोबाईल, 20 हजार रुपयाची दुचाकी आणि 2 हजार रुपयाचा टेबल फॅन जप्त केला आहे.

ही कारवाई पुणे ग्रामिणचे पोलीस अधीक्षक संदिप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक बारामती जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस हवालदार संदिप जाधव, सुरेंद्र वाघा, पोलीस नाईक स्वप्नील अहिवळे, पोलीस कॉन्स्टेबल विशाल जावळे, शर्मा पवार, भिगवण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रियाज शेख, शिरुर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे, आबा जगदाळे यांच्या पथकाने केली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/