कोरेगांव पार्क येथील हॉटेल डार्क हॉर्स मधील हुक्का पार्लवर छापा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

कोरेगाव पार्क पोलिस स्टेशनच्या हद्दीतील बर्निंग घाट रोडवरील  हॉटेल डार्क हॉर्स मधील हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापा टाकून मालक व व्यवस्थापकाला अटक केली आहे. ही कारवाई आज (मंगळवार) दुपारी एकच्या सुमारास करण्यात आली.

हॉटेल मालक प्रदीप प्रकाश प्रदेशी (रा. कोरेगाव पार्क) आणि व्यवस्थापक सुरज पिटर थापा (रा. कोरेगाव पार्क) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

हॉटेल डार्क हॉर्समध्ये हुक्का पार्लर चालू असल्याची माहिती कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक रमजान शेख यांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बहाद्दरपुरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गणेश माने, पोलीस उप निरीक्षक अरुण गौड यांच्या पथकाने हॉटेल डार्क हॉर्समध्ये छापा टाकला. त्यावेळी १९ ते २५ वयोगटातिल १२ मुले व ८ मुली हुक्का ओढत असताना आढळून आले.
[amazon_link asins=’B01N54ZM9W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’84b6e5f9-d15e-11e8-81e1-75926c03fa56′]
हॉटेलच्या पत्राशेडमध्ये विना परवाना हुक्का ओढण्यासाठी हुक्का फ्लेव्हर व त्याचे साहित्य कामगरांकडून पुरवले जात होते. लोखंडी शेगडीमध्ये कोळसा पेटवून तो निखारा ग्राहकाना पुरवण्यात येत होता. निखारा पुरवताना ग्राहकांच्या सुरक्षिततेची कोणतीच काळजी कामगरांकडून घेण्यात येत नसल्याचे निदर्शनास आले. तसेच हॉटेलमध्ये आग लागल्यास आग विझवण्यासाठी कोणतीही अग्निशामक यंत्रणा या ठिकाणी नाही. यामुळे ग्राहकांच्या जीवीताला धोका होऊ शकतो हे माहित असताना देखील आरोपींनी संगनमताने याठिकाणी हुक्का पार्लर सुरु केले होते.

हॉटेल चालक व मालक यांना अटक करुन त्यांच्यावर भारतीय दंड संविधान कलम २८५ कोपता कलम ४अ २१अ प्रमाणे गुनहा दाखल करण्यात आला आहे. तसेच छाप्यात मिळून आलेल्या २० मुला मुलींवर कोतपा कायद्यानुसार खटले भरण्यात आले आहे.

ही कारवाई परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त बच्चन सिंग, लष्कर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त जयश्री गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बहाद्दरपुरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गणेश माने, पोलीस उप निरीक्षक अरुण गौड, सहायक पोलीस फौजदार रावसाहेब आदर्श, पोलीस कर्मचारी रमजान शेख, निशीकांत सावंत, रणजीत भोसले, रियाज शेख, अशोक घाटशिले, तुकाराम शिंदे, श्रीनाथ कांबळे, महिला पोलीस शिपाई जयश्री ढोमे, शितल गुंड यांच्या पथकाने केली.