पुण्यातील कॅम्प परिसरातील हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुण्यामध्ये अवैध धंद्यांवर लगाम घालण्यासाठी गुन्हे शाखेकडून मागील काही दिवसांपासून अवैध धंद्यांवर कारवाई केली जात आहे. आज (शुक्रवार) गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे कॅम्पमधील टोरा टोरा आणि सुफी हॉटेलवर छापा टाकून या ठिकाणी अवैधरित्या सुरु असलेल्या हुक्का पार्लवर कारवाई केली.
[amazon_link asins=’B0734VLDTC’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5517b4c6-a796-11e8-a6c0-fde12b1538c7′]

पुणे कॅम्प परिसरात अवैधरित्या हुक्का पार्लर सुरु असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे दोन हॉटेलवर कारवाई केली. या कारवाईत टोरा टोरा हॉटेल व्यवस्थापकासह २२ जणांना ताब्यात घेण्यात आले. तर दुसऱी कारवाई सुफी हॉटेलवर करण्यात आली. सुफी हॉटेलमध्ये करण्यात आलेल्या कारवाईत हॉटेल व्यवस्थापकासह १२ जणांना ताब्यात घेण्यात आले.

कॅम्प परिसर हा पुण्यात प्रसिद्ध असून या ठिकाणी जास्त करुन तरुणांची रेलचेल जास्त प्रमाणात असते. तरुणांना व्यसनापासून आणि हुक्का पार्लर पासून दूर ठेवण्यासाठी ही कारवाई केली जात आहे. या परिसरातील दोन हॉटेलवर कारवाई केल्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
[amazon_link asins=’B00KNOW2SQ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5ac65434-a796-11e8-95eb-67b31db01bc2′]

ही कारवाई आर्थिक आणि गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त ज्योति प्रिया सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुनील दोरगे आणि त्यांच्या पथकाने केली.