इंदापूरात मटका अड्डयावर पोलिसांचा छापा, 70 हजार जप्त तर 9 जणांवर FIR

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या आनेक दिवसापासुन इंदापूर शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात मटका, जुगार, सोरट, बंद पाकुळी, ऑनलाईन जुगार यासारखे अनैतिक धंदे राजरोसपणे फोपावल्याने शहरातील सर्वसामाण्य नागरिक व तरून पिढी मोठ्या प्रमाणात वाममार्गाला लागल्याचे दिसुन येत आहे. तर सुशिक्षित बेकारांची मटका जुगाराच्या नादी लागण्याची संख्या सर्वात अधिक असल्याचे बोलले जात आहे. त्यात मटका व्यवसाय सर्वात जास्त आघाडीवर असुन इंदापूर पोलीसांनी या खुलेआम चालणार्‍या मटका अड्यावर छापामारी करून चार मटका बुकींना जागेवरच अटक केली आहे. तर पाच जण पळून गेल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. त्यांचेवर मुंबई जुगार अधिनियम १२(अ) प्रमाणे एकूण नऊ जणांवर इंदापूर पोलीसात गुन्हे दाखल करण्यात आले असुन यामध्ये एकुण ६९ हजार ९५० रूपये रोख व मटका बुकांसह साहीत्य जप्त करण्यात आली असल्याची माहीती इंदापूर पोलीसांनी दीली.

याबाबतची फिर्याद इंदापूर पो.ना. अमोल दिलीप खैरे यांनी इंदापूर पोलीसात दाखल केली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की आरोपी १) सोमनाथ सोपान शिंदे रा. इंदापूर हा त्याचे हस्तक २) ब्रम्हदेव ढावरे (अंबीकानगर), ३) नंदकुमार ढावरे (टेंभुर्णीनाका), ४) विशाल चोचकर (इंदापूर), ५) रहिम शेख (व्यकटेशनगर), ६) संतोष माने, ७) नंदु अडसुळ, ८) शेखर चव्हाण, ९) सुनिल गायकवाड सर्व रा. इंदापूर. यांचे मार्फत दिनांक १८ नोव्हेंबर रोजी दुपारी ३:१० ते ३५० वाजणेच्या सुमारास बाबा चौक, पंचायत समितीच्या पाठीमागील बाजुस कल्याण नावाचा मटका जुगार खेळत व खेळवित असताना इंदापूर पोलीस पथकाने त्याठीकाणी धाड टाकली व आरोपी क्र.२ ते ५ यांना कल्याण मटका बुके, मोबाईल, पेन साहित्य व रोख रक्कम ६९ हजार ९५० यासह ताब्यात घेवुन त्यांना अटक करण्यात आली आहे. तर आरोपी क्र. ६ ते ९ हे पोलीस पथक आल्याचा सुगावा लागताच पळून गेले असुन त्यांचेवरही इंदापूर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहीती इंदापूर पोलीसांनी दीली असुन पुढील तपास पो. ना. अलीभाई शौकतअली मड्डी हे करत आहेत.

राजरोसपणे का फोपावले इंदापूरात अनैतिक धंदे ?
कल्याण जेऊ देइना आणी मुंबई झोपू देइना अशी गत झालेल्या इंदापूर शहर परिसर व तालुक्यात सध्या अनैतिक धंदे मोठ्या प्रमाणात फोपावले असुन यावर पोलीस प्रशासनाचा धाकच राहीला नसल्याचे सर्वसामाण्य नागरिकातुन बोलले जात आहे. तर या अवैद्य व अनैतीक धंद्याच्या वाममार्गाला लागुन सर्वसामान्य नागरिक, तरून पीढी व सुशिक्षित बेकिरांचीच संख्या जास्त दिसुन येत आहे.  झटपट पैसा कमावण्याच्या नादात तरून पिढी जुगार, मटका, ऑनलाइन लाॅटरी, सोरट, बंद पाकुळी यासारख्या अवैद्य धंद्याच्या नादी लागुन आपले आयुष्य बरबाद करून घेताना दिसुन येत आहेत. तर आनेकजण कर्जबाजारी होऊन देशोधडीला लागल्याचे पाहीले असुन कीत्येकजण तर कर्जबाजारीपणामुळे गाव सोडून गेलेले दीसुन येत असुन तात्पुरती जुजबी कारवाई पोलीसांच्याकडून नको आहे, तर अशा धंद्याचा कायमचा बंदोबस्त होणे गरजेचे असल्याचे मत नागरीकातुन व्यक्त केले जात आहे.

इंदापूर शहरातील मध्यवर्ती भागात असे अनैतीक धंदे राजरोसपणे चालत असुन ऑनलाइन लाॅटरी, मटका व सोरट सारखे धंदे शहरातील मध्य वस्तीतील दररोज गजबजलेल्या ठीकाणी दीवसाढवळ्या राजरोसपणे सुरू आहेत. परंतु पोलीस प्रशासनाच्या नजरेस असे धंदे का येत नाहीत याचे कोडे न सुटणारे आहे. इंदापूरात मोठमोठे राजकीय व सामाजिक पुढारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत परंतु एकही पुढारी अथवा सामाजिक कार्यकर्ता याबाबतीत आवाज उठविण्याचे धाडस करत नाही. याचाच अर्थ कुठेतरी घोड पेंड खातय. जर कुंपनच शेत खात असेल तर सर्वसामाण्य नागरिक दाद मागणार कुणाकडे हा मोठा प्रश्न निर्माण होत असुन सर्वसामाण्य जणतेने याविरूद्ध आवाज उठवून असे धंदे बंद करण्यासाठी आवाज उठविणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.

Visit : Policenama.com