तुली इंटरनॅशनल हॉटेलच्या पबवर पोलिसांचा छापा

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन

तुली इंटरनॅशनल हॉटेलमध्ये सुरू असलेल्या आर एन बी पबवर मध्यरात्री पोलिसांनी छापा टाकला. रात्री उशिरापर्यंत सुरु असलेल्या या पबमध्ये शेकडो तरुणतरुणी मद्यधुंद अवस्थेत नृत्य करताना दिसत होते. पोलिसांना चुकवून ३ मद्यधुंद तरुणी पळाल्या. त्या पोलिसांनी आपल्याला पकडू नये, म्हणून भरधाव वेगाने कारने जात असताना दुसऱ्या वाहनांना धडक दिली. या कारच्या धडकेत ४ जण जखमी झाले आहेत.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a20ad5c4-c465-11e8-b348-61b80fb079d4′]

पोलीस उपायुक्त निलेश भरणे यांना तुली इंटरनॅशनल हॉटेलमधील आर एन बी पब रात्री उशिरापर्यंत सुरु असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार मध्यरात्री २ च्या सुमारास पोलिसांनी या पबवर छापा टाकला. यावेळी पोलिसांनी तोकड्या कपड्यातील मुलींसह अनेक जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांना येथे बेकायदेशीर ड्रग्ज दिले जात असल्याचा संशय आहे. त्यामुळे ताब्यात घेतलेल्या तरुण तरुणींची तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीत काही आढळल्यास त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

हरवलेला मुलगा चार तासांनी शौचालयात सापडला

नागपूरमध्ये अनेक पंचतारांकित हॉटेल व पबमध्ये रात्री उशिरापर्यंत डान्स फ्लोअरवर तरुणतरुणी बेधुंद अवस्थेत नाचताना दिसतात. त्यात शनिवारी आणि रविवारी मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. काही ठिकाणी तर पहाटे पर्यंत खुल्या प्रमाणावर दारू विक्री केली जाते.

[amazon_link asins=’B01N3OU3SF’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b500f5e3-c465-11e8-ad74-93c289b4f918′]