Police Raid | खंडणी वसुलीसाठी पोलिसांची छापेमारी ! 3 तरुणांना बेदम मारहाण एकाचा मृत्यू; 6 पोलीस निलंबित

गोरखपूर : वृत्तसंस्था – हॉटेलमध्ये छापेमारी दरम्यान (Police Raid) पोलिसांनी तरुणांना केलेल्या अमानुष मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाला. हॉटेलमध्ये थांबलेल्या तीन तरुणांकडून खंडणी (Ransom) वसुली करण्यासाठी पोलिसांनी त्यांच्या खोलीत छापेमारी (Police Raid) केल्याचा आरोप (Allegation) पोलिसांवर आहे. या घटनेनंतर या प्रकरणातील 6 आरोपी पोलिसांवर निलंबनाची (6 cops suspended) कारवाई करण्यात आली आहे. तर मृत तरुणाच्या पत्नीने पोलिसांविरुद्ध खुनाचा (murder) गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मनिष, प्रदीप आणि अरविंद हे तीन तरुण गोरखपूरला (gorakhpur) आपल्या मित्राला भेटण्यासाठी आले होते. सोमवारी (दि.27) सकाळी आठच्या सुमारास रामगढ ताल परिसरातील कृष्णा पॅलेस हॉटेलमध्ये (Krishna Palace Hotel) ते थांबले. रात्री साडेबाराच्या सुमारास अचानक काही पोलीस त्यांच्या खोलीत आले. त्यांनी त्यांचे ओळखपत्र (ID card) तपासल्यानंतर त्यांच्या सामानाची झडती घेण्यास सुरुवात (Police Raid) केली.

Gold Price Today | जारी झाले सोने-चांदीचे दर, जाणून घ्या आजचा 10 ग्रॅम सोन्याचा भाव

पोलिसांकडून तरुणांना मारहाण

पोलीस सामानाची झडती घेत असताना तरुणांनी छापेमारीचे कारण विचारले. त्यावेळी पोलिसांनी अरविंद नावाच्या तरुणाला मारहाण (Beating) करत खोलीबाहेर काढले. अरविंदने सांगितलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी तो खोलीबाहेर उभा होता, तेव्हा त्याने खोलीच्या आतून मनिषला मारहाण केल्याचा आवाज ऐकला आणि पोलीस त्याला खोली बाहेर आणत असल्याचे पाहिले. मनीषच्या चेहऱ्यातून खूप रक्त येत होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या कारमधून त्याला रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले. रुग्णालयात डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषीत केले.

पोलिसांवर वसुलीचा आरोप

राणा प्रताप चंद उर्फ चंदन सैनी (रा. गोरखपूर) यांनी सांगितले की, तिघे त्याचे मित्र आहेत आणि त्याला भेटण्यासाठी गोरखपूरला गेले होते. परंतु, तरुण बाहेर गावावरुन आल्याचे समजताच पोलिसांनी त्यांच्याकडून वसुली करण्यासाठी खोलीत घुसून मारहाण केली, असा आरोप पोलिसांवर आहे. दरम्यान, मनीष गुप्ताच्या (Manish Gupta) पत्नीला पतीच्या मृत्यूची बातमी समजताच तिने कानपूरहून गोरखपूर गाठले. आता पोलिसांवर खुनाचा खटला चालवण्याची मागणी मनीषच्या कुटुंबियांकडून होत आहे.

हे देखील वाचा

Solapur Crime | पुण्यातील ‘विवाहित’ प्रेमी युगुलाची सोलापूर जिल्ह्यातील लॉजवर आत्महत्या; जाणून घ्या प्रकरण

Pune Crime | पुण्यातील ‘त्या’ कार्यकर्त्याला पश्चिम बंगाल हिंसाचार प्रकरणी सीबीआयने केली अटक

BJP-MNS Alliance | ‘या’ 4 निवडणुकांमध्ये भाजप-मनसे युती होणार? शिवसेनेची चिंता वाढली?

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Police Raid | one man dies after police raid gorakhpur hotel 6 cops suspended in up

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update