नगर-पुणे महामार्गावरील डान्सबारवर पोलिसांचा छापा, 7 महिलांना घेतले ताब्यात…परिसरात खळबळ

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – नगर-पुणे रस्त्यावरील जातेगाव घाटातील हॉटेलवर सुरू असलेल्या बेकायदा डान्सबारवर पोलिसांनी छापा टाकून सुमारे 15 जणांना ताब्यात घेतले आहे. आज रात्री झालेल्या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.

नगर-पुणे रस्त्यावरील सुपा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या जातेगाव घाटातील हॉटेल जयराज येथे बेकायदा डान्सबार सुरू होता. या घटनेची माहिती खबर्‍याने पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांना दिली. त्यावरून सिंधू यांनी पोलिसांना कारवाईचे आदेश दिले. पोलिसांच्या पथकाने हॉटेलवर छापा टाकून महिला व पुरुष अशा सुमारे 15 जण घेतले. पोलिस आल्याचे समजताच काही जण पळून गेले.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांना सुपा पोलीस ठाण्यात आणले. याप्रकरणी सुपा पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. नगर-पुणे या मार्गालगत असलेल्या हॉटेलवरील डान्सबारवर छापा पडताच एकच खळबळ उडाली आहे. छाप्याची माहिती मिळतात पारनेर तालुक्यातील अनेकांनी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. पकडलेल्यांमध्ये अनेक प्रतिष्ठितांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आरोग्यविषयक वृत्त