Pune : मटका किंग जॉय नायरच्या दोन अड्यांवर गुन्हे शाखेचे छापे ; १९ आरोपींना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मटका किंग बबलू उर्फ जॉन नायर याच्या मटक्याच्या अड्ड्यावर पुणे गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पथकाने छापा टाकून १९ जणांना अटक केली. या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कमेसह ८० हजार २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुरुवारी रात्री खडकी आणि बोपोडी येथे करण्यात आली.

खडकी परिसरात मटका किंग म्हणून प्रसिद्ध असलेला बबलू उर्फ जॉय नायर हा खडकी आणि बोपोडी परिसरात लपून मटका आणि पत्यांचा क्लब चालवत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. गुरुवारी पोलिसांनी नायर याच्या दोन्ही अड्ड्यावर एकाच वेळी छापा टाकण्यात आला. या कारावईत १९ जणांना अटक करण्यात आली. तसेच जुगाराचे साहित्य, रोख रक्कम असा एकूण ८० हजार २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त गुन्हे शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-२ भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड, निलेश महाडीक, पोलीस कर्मचारी अब्दुल सय्यद, शंकर पाटील, राजू मचे, सचिन ढवळे, रमेश चौधर, निलेश शिवतरे, सुरेंद्र साबळे यांच्या पथकाने केली.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like