एमएस कॉफी हाऊसवर पोलिसांचा छापा, १० प्रेमीयुगुलांवर कारवाई

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन-विश्रामबागमधील आलदर चौकातील एम. एस कॉफी हाऊसमध्ये पोलिसांनी आज (गुरुवार) छापा टाकला. अश्‍लिल चाळे करणाऱ्या दहा प्रेमीयुगुलांवर पोलिसांनी कारवाई केली. कॉफी हाऊसचा मालकासह व्यवस्थापकावरही गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,  जिल्ह्यातील कॉफी हाऊसमध्ये चालणाऱ्या अश्‍लिल प्रकारांवर प्रतिबंधक कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा, अप्पर अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी दिले होते. त्यानुसार खास पथक तयार करण्यात आले.

विश्रामबागमधील आलदर चौकातील एम. एस. कॉफी हाऊसमध्येही महाविद्यालयीन तरूणाई अश्‍लिल चाळे करत करतात. अश्‍लिल चाळे करण्याकरिता कॉफी हाऊसचा चालक शंभर रूपये घेत अल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी दहा प्रेमीयुगुल अश्‍लिल चाळे करत असताना मिळून आले. त्यांच्यासह कॉफी हाऊस चालक आणि व्यवस्थापकावरही कारवाई करण्यात आली. ताब्यात घेतलेल्या मुला-मुलींचे डॉ. ज्ञानचंद्र पाटील यांनी समुपदेशन केले.

एलसीबीचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे, सहायक निरीक्षक विद्या जाधव, शकुंतला वागलगावे, भगवान नाडगे, विकास पाटणकर, महेशकुमार जिगनर, मनिषा कोरे, संदीप तेली, अभिजित गायकवाड, सीमा पाटील, शरद कोळेकर, दीपक ताटे यांचा कारवाईत सहभाग होता.

जिल्ह्यातील कॉफ हाऊसची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच अन्य कॉफी हाऊसमध्ये असे प्रकार चालत असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, अशी माहिती अधीक्षक सुहैल शर्मा यांनी दिली.