जंगलात ‘मंगल’ रेव्ह पार्टीचा पर्दाफाश, अंमली पदार्थ जप्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हिमाचल प्रदेशच्या कुलू जिल्ह्यातील पार्वती व्हॅलीच्या कसोलला लागून असलेल्या जंगलात पोलिसांनी रेव्ह पार्टीवर रेड मारली आहे. पोलिसांनी रात्री अडीच वाजता या पार्टीच्या ठिकाणी प्रवेश केला. डीजेच्या धुंदीत नाचणाऱ्या आणि नशेत असलेल्या देशी-विदेशींमध्ये गडबड सुरु झाली. त्यानंतर पोलिसांनी रेव्ह पार्टी आयोजित करणाऱ्या आयोजकांना अटक केली. त्या सोबत पोलिसांनी इतर सामान सुद्धा पार्टीमधून जप्त केले आहे.

पोलिसांनी आयोजकांवर गुन्हा टाकून पुढील तपास सुरु केला आहे. पोलिसांना गुप्त सूचना मिळाली होती की जंगलानजीक पायवाट असलेल्या ठिकाणी विना परवानगी पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. एस आय निरीक्षक सुनील सांख्यान यांनी एक टीम घेऊन जंगलातून दोन तासांपेक्षा जास्त चालत जाऊन या रेव्ह पार्टीवर छापा टाकला.

विना परवाना डीजे आणि पार्टी केली जात होती,पार्टी दरम्यान पोलिसांनी अनेक नशेचे पदार्थ जप्त केलेले आहेत. ज्यांना तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहे. यासोबतच पोलिसांनी २ लॅपटॉप, १ ऍम्प्लिफायर, १ कंट्रोलरसुद्धा जप्त केले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

 

You might also like