काय सांगता ! होय, नववर्षाचं स्वागत 24 बारबालांचा अश्लील डान्स बघत केलं, 11 जण ताब्यात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत जल्लोष सुरू असताना मुंबईतील अंधेरी परिसरातील पिंक प्लाजा बारवर पोलिसांनी धाड टाकली. या बारमध्ये 24 बारबाला अश्लील नृत्य करताना आढळून आल्या. पोलिसांनी या बारबालांना ताब्यात घेतले आहे. तर 7 ग्राहक, 2 मॅनेजर आणि 2 वेटर्सला अटक केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईत नवीन वर्षाचे स्वागत जल्लोषात करण्यात आले. ठिकठिकाणी पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सर्वत्र पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी अंधेरीच्या पिंक प्लाझा बारमध्ये अवैधरित्या अश्लील नृत्य व अन्य प्रकार सुरू असल्याचे समजता पोलिसांनी या बारवर छापा टाकून 24 बारबालांना ताब्यात घेतले. तसेच 7 ग्राहकांसह 4 बार कर्मचार्‍यांना अटक केली आहे.

2020 चे स्वागत करण्यासाठी मुंबई शहरामध्ये व उपनगरांमध्ये विविध ठिकाणी गर्दी आणि वाहतूकीसाठी मुंबई पोलीस दलाकडून मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. नवीन वर्षाच्या रात्री 40 हजाराहून अधिक पोलीस कर्मचारी मुंबईच्या रस्त्यावर तैनात करण्यात आले होते. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मरीन ड्राइव्ह, जुहू चौपाटी, गेटवे ऑफ इंडिया, गिरगाव चौपाटी अशा ठिकाणी गर्दी उसळली होती. संपूर्ण मुंबई शहरामध्ये 40 हजारांपेक्षा जास्त पोलीस कर्मचारी 31 डिसेंबरच्या रात्री तैनात होते. तसेच आरसीपी, क्यूआरटी, एसआरपीएफ, बीडीडीएसची पथकेही तैनात होती. मुंबईतील नववर्षातील जल्लोषावर 5000 कॅमेरांचा वॉच होता. एक कंट्रोल रूम आणि यावर नियंत्रण करण्यासाठी अधिकारीही तैनात करण्यात आले होते.

महिलांच्या छेडछाड होऊ नये म्हणून साध्या कपड्यांमध्ये पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. गर्दीच्या ठिकाणी जसे की गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी आणि धार्मिक स्थळावर बाँबस्क्वॉड पथक तैनात करणत आले होते. अनेक ठिकाणी अल्कोमीटरने वाहनचालकांची तपासणी करण्यात येत होती. यामध्ये मद्यपान करून वाहन चालविणार्‍यांवर कारवाई करण्यात आली. ड्रंक ड्रायव्हिंगवर पोलिसांनी जास्त वॉच ठेवला होता. शहरात आणि उपनगरात 100 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. ड्रंक अँड ड्राइव्ह थांबविण्याकरिता विशेष कॅमेरे लावण्यात आले होते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

मधुमेह असल्यास आहारामध्ये करा ‘या’ ४ पदार्थांचा समावेश
‘हे’ ७ उपाय केल्यास सतत येणारा थकवा जाईल पळून, जाणून घ्या
जेवण पॅक करण्यासाठी ‘फॉईल पेपर’ वापरता ? ‘हे’ ७ दुष्परिणाम जाणून घ्या
मासिक पाळीत स्वच्छता राखण्यासाठी ‘या’ ६ गोष्टी लक्षात ठेवा !
गूळ खाण्याने वाढते वजन, जास्त खाण्याचे ‘हे’ ६ तोटे जाणून घ्या
मातेच्या स्तनपानामुळे बाळांना होतात ‘हे’ ६ फायदे, जाणून घ्या
लवंग खाण्याचे ‘हे’ ६ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का ?