पुण्यात वैधानिक इशारा न छापलेल्या उंची विदेशी सिगारेटचा ९ लाखांचा साठा जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – वैधानिक इशारा शासकीय नमुन्यात न छापलेल्या परदेशी कंपन्यांच्या महागड्या सिगारेटचा ९ लाख १९ हजार ५०० रुपयांचा साठा खंडणी विरोधी पथकाने जप्त केला आहे. पुण्यातील कॅम्प परिसरातील लाल देऊळ सोसायटीतील गोदामावर छापा टाकून पोलिसांनी ही कारवाई केली. तर तिघांविरोधात लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उमर फारुख शेख (वय ४०, रा. लाल देऊ हौसिंग सोसायटी, लष्कर), महंमद अफजल युसुफ (वय २०) व फ्लॅटमालक हिदायतुल्ला खशमुदउल्ला खान (वय ४०) अशा तिघांविरोधात लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

लाल देऊळ हाऊसिंग सोसाय़टीतील छापा

गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी आणि अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी व कर्मचारी गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस कर्मचारी फिरोज बागवान आणि रमेश गरुड यांना बातमी मिळाली की, लाल देऊळ हाउसिंग सोसायटीमध्ये असलेल्या फ्लॅटमध्ये उमर फारुख शेख याने वैधानिक इशारा न छापलेल्या विदेशी कंपन्यांच्या सिगारेटचा साठा केला आहे. त्यानंतर पथकाने तेथे छापा टाकला. त्यावेळी तेथे उमर शेख व महंमद अफलज युसुफ यांना ९ लाख १९ हजार ५०० रुपयांच्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या सिगारेटची पाकिटे मिळून आली.

फ्लॅट मालकावरही गुन्हा

लाल देऊळ हाऊसिंग सोसायटीतील फ्लॅटमध्ये हा साठा करण्यात आला होता. त्या फ्लॅटचे मालक फिदायतउल्ला खान यांनी ही खोली उमर शेख ला भाड्याने दिली आहे. सिगारेटसंदर्भात माहिती असतानाही त्यांनी दुर्लक्ष केले म्हणून पोलिसांनी मालकासह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

कोणत्या सिगारेटची पाकिटे जप्त

पाईन, क्लिओ पात्रा किंग साईज, गुडंगगरम, बीन, इसे, मारलबोरो इत्यादी कंपन्यांच्या सिगारेटची पाकिटे मिळून आली.

ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आय़ुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते, पोलीस उपनिरीक्षक आनंद रावडे, निखील पवार, कर्मचारी अविनाश मराठे, रमेश गरुज, फिरोज बागवान, शिवानंद बोले यांच्या पथकाने केली.

आरोग्यविषयक वृत्त (www.arogyanama.com) 

सुंदर दिसण्यासाठी ‘हे’ ७ पदार्थ चेहऱ्यावर चुकूनही लावू नका

अर्थरायटिसला दूर करण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

केळीच्या सालीचे उपाय चकित करणारे, जाणून घ्या फायदे

अपचनाच्या समस्येसाठी ‘वज्रासन’ फायद्याचे

घरगुती पद्धतीने ‘वजन’ करा झटपट कमी