1019 जागांसाठी पोलिस भरती, जाणून घ्या कोणत्या जिल्हयात किती पदे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात नवं सरकार स्थापन झाल्यानंतर सर्वात आधी मागणी सुरु झाली ती नोकरभरतीची. त्यानंतर आता नवं सरकार स्थापन झाल्यावर पहिल्यांदाच पोलीस भरती प्रकिया राबवण्यात येणार आहे. राज्यात बऱ्याच राजकीय घडामोडी झाल्यानंतर आता राज्याला स्थिर सरकार मिळाले आहे. त्यानंतर तात्काळ पोलीस भरती काढण्यात आली आहे.

सध्या राज्य शासनाकडून विविध विभागांसाठी नोकरभरतीच्या परिक्षा महापोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जात होत्या. परंतू महापोर्टबाबत अनेक तक्रारी आल्या होत्या. हे पोर्टल बंद करुन नवं पोर्टल सुरु करावं अशी विनंती खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे करण्यात आली. त्यानंतर राज्य सरकारकडून तात्काळ 1019 जागांसाठी पोलीस शिपाई चालक पदांची पोलीस भरती राबवण्यात आली आहे. मुख्यमंत्री आणि काही मंत्र्यांनी शपथ घेतली तरी मंत्रीपदं कोणती हे अजून जाहीर झाले नाही. सरकारकडून 1019 पोलीस पदांची जाहिरात काढण्यात आली आहे. आर. आर. पाटील यांच्या काळात ज्याप्रकारे मोठी भरती राबवण्यात आली होती तशी भरती राबवण्यात यावी अशी नव्या सरकारकडून अपेक्षा आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख – 22 डिसेंबर 2019
पोलीस आयुक्तालय, बृहन्मुंबई – 156 जागा
पोलीस आयुक्तालय,नागपूर शहर – 87 जागा
पोलीस आयुक्तालय,ठाणे शहर – 116 जागा
जागा पोलीस आयुक्तालय, अमरावती शहर – 19 जागा
पोलीस आयुक्तालय, नवी मुंबई – 103
पोलीस आयुक्तालय, लोहमार्ग मुंबई – 18 जागा
पोलीस आयुक्तालय, औरंगाबाद शहर – 24 जागा
पोलीस अधीक्षक कार्यालय, सिंधुदूर्ग – 20 जागा
पोलीस अधीक्षक कार्यालय, रायगड – 27 जागा
पोलीस अधीक्षक कार्यालय, सांगली – 77 जागा
पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी – 44 जागा
पोलीस अधीक्षक कार्यालय, जालना – 25 जागा
पोलीस अधीक्षक कार्यालय, सोलापूर ग्रा. – 41 जागा
पोलीस अधीक्षक कार्यालय, उस्मानाबाद – 33 जागा
पोलीस अधीक्षक कार्यालय, बीड – 36 जागा
पोलीस अधीक्षक कार्यालय, नागपूर ग्रा. – 28 जागा
पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर – 6 जागा
पोलीस अधीक्षक कार्यालय, वर्धा – 37 जागा
पोलीस अधीक्षक कार्यालय, भंडारा – 36 जागा
पोलीस अधीक्षक कार्यालय, बुलढाणा – 52 जागा
पोलीस अधीक्षक कार्यालय, अकोला – 34 जागा

शैक्षणिक पात्रता – 12 वी उत्तीर्ण
वयोमर्यादा – 28 वर्षांपर्यंत (मागासवर्गीयांना वयोमर्यादेत सवलत)