Police Recruitment Exam Scam | पोलीस भरती परीक्षा घोटाळ्यातील 6 रॅकेटचा पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेकडून पर्दाफाश, 56 जणांना अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पोलीस भरती घोटाळ्यातील (Police Recruitment Exam Scam) 6 रॅकेटचा पर्दाफाश (Racket Busted) पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या (Pimpri-Chinchwad Police) गुन्हे शाखा युनिट चारने (Crime Branch Unit Four) करुन 56 जणांना अटक (Arrest) केली आहे. यातील 5 जणांना 22 ऑगस्ट रोजी औरंगाबाद, जालना आणि बीड येथून अटक केली. त्यांच्याकडून 100 हून जास्त ब्ल्यु-टुथ इयर बग्ज (Bluetooth Ear Bugs), मोबाईल फोन (Mobile Phone) व स्पाय डिव्हाइसेस (Spy Devices), वॉकीटॉकी (Walkie-Talkies), चार्जर आणि रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला आहे. भरती प्रक्रियेत घोटाळा (Police Recruitment Exam Scam) झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर याबाबत निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलात 720 जागांसाठी पोलीस शिपाई पदाची भरती (Police Constable Recruitment) नोव्हेंबर 2021 मध्ये झाली होती. ही भरती प्रक्रिया जानेवारी 2022 पर्य़ंत सुरु होती. यामध्ये घोटाळा झाल्यानंतर निगडी पोलीस ठाण्यात (Nigdi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट चार करत होते. पोलिसांनी केलेल्या तपासात यापूर्वी 56 जणांना अटक केली. यातील 26 जण हे भरतीमध्ये उमेदवार होते. याशिवाय आणखी 75 पेक्षा अधिक या गुन्ह्यात आरोपी असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या 75 आरोपीमधील 12 आरोपी भरती प्रक्रियेत घोटाळा (Police Recruitment Exam Scam) करुन देखील नापास झाले आहेत.

 

गुन्हे शाखेच्या पथकाने औरंगाबाद (Aurangabad), जालना (Jalna) आणि बीड (Beed) येथून ज्ञानेश्वर सुखलाल चंदेल (वय-29 रा. जालना), कार्तिक उर्फ वाल्मिकी सदाशिव जारवाल (वय-23 रा. औरंगाबाद), अरुण विक्रम पवार (वय-26 रा. बीड), अर्जुन विष्णू देवकाते (वय-28 रा. बीड), अमोल संभाजी पारेकर (वय-22 रा. बीड) यांना 22 ऑगस्ट रोजी अटक केली आहे. त्यांच्याकडून 76 मोबाईल, 66 इलेक्ट्रॉनिक स्पाय डिव्हाईस, 22 वॉकीटॉकी, 11 वॉकीटॉकी चार्जर, 11 लाख रुपये रोख असे मोठे घबाड जप्त केले. याशिवाय डिव्हाईस लपवून परीक्षेला नेण्यासाठी वापरलेले कापडे, सिमकार्डस, कागदपत्रे देखील जप्त केली.

वेगवेगळ्या शहरांतून 20 पेक्षा जास्त कारवाई
औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यात परीक्षांमध्ये गैरप्रकार करणाऱ्या सहा टोळ्यांचा या कारवाईत पर्दाफाश केला आहे.
आजवर बीड, औरंगाबाद, जालना, नागपुर, अमरावती, अहमदनगर अशा वेगवेगळ्या ठिकाणी 20 हून
अधिक वेळा वेगवेगळ्या तपास पथकांनी आरोपी राहत असणाऱ्या दुर्गम परिसरात जाऊन आरोपींना अटक केली आहे.

 

गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट चार, सायबर सेल, तांत्रिक विश्लेषण विभाग, विशेष पथकाचे पोलीस अधिकारी अंमलदार यांनी संयुक्तपणे केला.

 

Advt.

Web Title :- Police Recruitment Exam Scam | six racket busted in police recruitment exam scam 56 people were arrested

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Garlic Health Benefits | ब्लड प्रेशरपासून कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्याचे काम करतो लसून, जाणून घ्या तो खाण्याचे 5 फायदे

 

Leopard in Pune | पुण्यातील विश्रांतवाडीतील DRDO संस्थेत बिबट्याचा वावर ?, परिसरात प्रचंड खळबळ

 

Anti Corruption Bureau (ACB) Pune | 50 हजारांची लाच मागणारा कनिष्ठ अभियंता अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात