Police Recruitment | तृतीयपंथींचे पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण होणार, ‘मॅट’ने दिले महत्त्वाचे आदेश
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात पोलीस भरती (Police Recruitment) होणार असून या भरतीमध्ये सर्व घटकांना आरक्षण तसेच विविध माध्यातून सामावून घेतले जणार आहे. आता पोलीस भरतीमध्ये तृतीयपंथींना देखील या भरतीमध्ये अर्ज करता येणार आहे. त्यासाठी 4 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन सुविधी उपलब्ध करुन देऊन तृतीयपंथींना भरती प्रक्रियेत (Police Recruitment) सामावून घेण्यात यावे, असा आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) यांच्याकडून बुधवारी (दि.30) देण्यात आला आहे.
पोलीस भरतीमध्ये (Police Recruitment) ट्रान्सजेंडर यांच्यासाठी कोणत्याही प्रकारचे आरण नसल्याने लैंगिकतेवरुन भेदभाव होत असल्याचा आरोप तृतीयपंथींनी केला. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सुरक्षा विभागात सुरक्षरक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या निकिता मख्यदल यांनी यासंदर्भात मुख्यंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ईमेलच्या माध्यमातून निवेदन दिले होते. निकिता या ‘ट्रान्स’ महिला आहेत. त्या आणि इतर तृतीयपंथी पोलीस भरतीसाठी सराव करीत आहे.
यंदाच्या पोलीस भरतीमध्ये ट्रान्सजेंडर यांच्यासाठी आरक्षण राहील अशी अपेक्षा होती. मात्र तृतीयपंथींना या भरतीमध्ये आरक्षण दिले नाही. तृतीयपंथींना टाळून त्यांच्यावर अन्याय का? पोलीस भरतीची तयारी केल्यानंतर देखील संधी दिली नाहीतर स्वत:ला सिद्ध कसे करायचे? नोकरीसाठी लिंग महत्त्वाचे आहे की, पात्रता आणि टॅलेंट, असे प्रश्न निकिता यांनी उपस्थित केले.
निकिता यांनी याबाबत मॅटकडे धाव घेतली. मॅटने त्यांची दखल घेत आदेश दिले आहेत.
भरती प्रक्रियेमध्ये अर्ज सादर करण्यासाठी तृतीयपंथींसाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करुन द्यावा.
तसेच भरतीसाठी महिला उमेदवारांना असलेले निकष त्यांच्यासाठी असावेत असे आदेश मॅटने दिले आहेत.
Web Title :- Police Recruitment | Third party’s dream of becoming a policeman will be fulfilled, ‘Matt’ gave important orders
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Nadav Lapid | ‘नदाव लॅपिड म्हणजे इस्रायलमधील जितेंद्र आव्हाड’ – अतुल भातखळकर